नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…

नाशिक: गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस तपासादरम्यान अशोक खरात याचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भविष्य जाणून घेण्यासाठी बडे बडे नेते, सेलिब्रिटी अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावायचे. तसेच अशोक खरात याचा आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आरोपी धार्मिक विधीचा बहाणा करत महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवतो आणि त्यानंतर गैरवर्तन करतो. संबंधित व्हिडीओ अत्यंत आक्षेपार्ह असल्याने तो सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

नाशिकमधील भोंदूबाबा संशयित अशोक खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात नोव्हेंबर २०२२ साली पीडिता विधीबाबत चर्चा करण्यासाठी एकटी गेली होती. यावेळी बाबाने ही संधी साधून कार्यालयातील चेंबरमध्ये बोलावून घेतले. प्रसाद म्हणून पेढा खाण्यास दिला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात असलेले पाणी पाजले. त्यामुळे पीडितेला गुंगी आली आणि डोकं जड झाले. यावेळी बाबाने तिच्यासोबत जवळीक साधत ‘तू माझी प्रेयसी बनून राहिली नाही, तर तुझ्यावर परमेश्वराचा कोप होईल आणि तुझा होणारा नवरा मृत्युमुखी पडेल, मी तुला एकप्रकारे पवित्र करीत आहे…’ असे सांगून भीती घालून जबरदस्ती करून शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अशोक खरात याच्यासोबत पीडितेची ओळख २०१९ साली कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात झाली होती. त्यावेळी सोबत तिचे दाजीदेखील होते. ‘मला दैवीशक्ती प्राप्त असून, त्या शक्तीच्या सामर्थ्याने मी तुझ्या आयुष्यात असलेले अडथळे दूर करतो. तुझे श्रीमंत घराण्यात लग्न होईल, तुझे करिअरदेखील घडेल, त्यासाठी तुला माझ्याकडे येऊन काही विधी कराव्या लागतील…’ असे सांगून तिचा विश्वास मिळवला होता.

पुन्हा २०२१ साली पीडितेचा साखरपुडा गावाकडे झाला. नंतर तो मोडला तेव्हा खरात बाबाने पुन्हा धीर देत ५० हजार रुपये रोख घेत ‘पुष्कराज’चा खडा दिला. ‘हा खडा ‘सिद्ध’ करून दिला असून, तो पुन्हा गळ्यात घालण्यास सुरुवात कर, तुझे कल्याण होईल…’ असे सांगितले. २०२२ साली दुसऱ्यांदा तिला लग्नाचे स्थळ आले आणि पीडितेचा साखरपुडा होऊन लग्नसोहळाही पार पडला. लग्नाची बातमी खरात यास सांगितली, त्यानंतर त्याने जोडीने आशीर्वाद घेण्यासाठी पीडितेला कार्यालयात बोलावून घेतले आणि पुन्हा त्याच पद्धतीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, कॅप्टन अशोक खरात याला अटक केल्यानंतर सिन्नर तालुक्यातील मिरगावचे ईशानेश्वर मंदिर चर्चेत आले आहे. 16 ऑगस्ट 2010 रोजी मंदिराची स्थापना केली होती. याच मंदिराच्या विश्वस्त पदावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर कार्यरत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशानेश्वर महादेव मंदिराला भेट दिल्यानंतर मंदिर आणि अशोक खरात दोघेही चर्चेत आले. ईशान्येश्वर मंदिर जवळच अशोक खरातचा आलिशान फार्म हाऊस आहे. तिथे शनिवारी, रविवारी अशोक खरात येत असे, त्याच बरोबर, कोणी सेलिब्रिटी, व्हिआयपी आलेत तर त्यांच्यासोबत फार्महाऊसमध्ये मिटींग करत असल्याची स्थानिकांची माहिती आहे. या व्यतिरिक्त इतर शहरात देखील त्याची कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी असल्याचा पोलिसांनी संशय असून या मालमत्ता चा शोध घेतला जाणार आहे.

अशोक खरात हा लोकांचे भविष्य सांगत होता, त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते, या भोंदू बाबा विरोधात एका महिलेने फिर्याद दिली आहे, स्वतः कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनात विश्वास संपादन करून त्याने ऑफिसमध्ये बोलावून गुंगीकारक पदार्थ खायला देऊन अत्याचार केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

नाशिक! भोंदूबाबाची महिलेली धमकी; माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर…

पुणे शहरात भोंदूबाबाने महिलेला फसवलं; सोन्याच्या हंड्यात निघाली माती…

पुणे! भोंदूबाबाचे अश्लील चाळे; चिठ्ठीवर तारीख लिहायचा अन्…

भोंदूबाबाने अल्पवयीन मुलींना नग्नावस्थेत पुजेला बसावे लागेल सांगून केले लैंगिक शोषण…

भोंदूबाबा महिलेला काही टेन्शन घेऊ नकोस असं म्हणाला अन् खोलीमध्ये गेल्यावर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!