
कोल्हापूर! ७३ वर्षाच्या वर्गमित्राने चिरला ७० वर्षीय मित्राचा गळा अन्…
कोल्हापूर: हनुमान नगरमध्ये किरकोळ वादातून एका व्यक्तीने आपल्याच मित्राचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी खोलीला आगही लावली. पण पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपीचं बिंग फोडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
चंद्रकांत केदारी शेळके (वय ७३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मोहन सूर्यकांत पोवार (वय ७०) असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे. पोलिसांनी खूनासह पुरावे नष्ट करण्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मृत मोहन पवार आणि आरोपी चंद्रकांत शेळके दोघंही एकमेकांचे वर्गमित्र होते. दोघे अनेकदा सोबत फिरायचे. त्यांच्यात गप्पा गोष्टी व्हायच्या. पण काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाच्या भरात मोहन पोवार यांनी चंद्रकांत शेळके यांना आईवरून शिवी दिली. त्यामुळे संतापलेल्या चंद्रकांत शेळके यांनी धारदार वस्तूने मोहन पोवार यांचा गळा चिरला. या घटनेत मोहन पोवार यांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चंद्रकांत शेळके यांनी मोहन पोवार यांच्या खोलीला आग लावली. मात्र, ही घटना पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ तपास सुरू केला.
जुना राजवाडा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी संयुक्तपणे तपास करत आरोपी चंद्रकांत शेळके याला अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मित्रानेच मित्राचा खून केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
लातूर! सुटकेसमधील महिलेच्या मृतदेहाचं गूढ उलगडलं, खुनी निघाला…
प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…
कोल्हापूर! नवऱ्याने मध्यरात्री आवळला पत्नीचा गळा; पैसे कोणाला देतेस…
कोल्हापूर! ग्रामपंचायत सदस्याचा खून अनैतिक संबंधातून, चौघांना अटक…
कोल्हापूर! प्रियकराने लॉजवर पत्नीसारखीच केली प्रेयसीची क्रूरपणे हत्या..

