तू माझी झाली नाही तर, मी तूला कोणाचीच होऊ देणार नाही…

पुणे: पुणे शहरात युवतीला एकतर्फी प्रेमातून ‘तू माझी झाली नाही तर, मी तूला कोणाचीच होऊ देणार नाही’ असे म्हणत ब्लेडने वार करण्याची धमकी दिली आहे. धायरी परिसरात ही घटना घडली असून, या प्रकरणी एकावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक प्रकाश गायकवाड याच्यावर विनयभंगासह धमकी दिल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. दीड महिना युवक तरुणीला धमकी देत असल्याची माहिती समोर आली आहे. युवतीला रस्त्यात अडवून जबरदस्तीने अंधारात नेत तिच्यासोबत असभ्य वर्तन आरोपीने केले. त्याचबरोबर ‘तू माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्यावर ब्लेडने वार करीन. तू माझी नाही झाली तर मी कोणाचीच होऊ देणार नाही’, अशी धमकी दिली होती. या प्रकारानंतर युवतीने पोलिसांत धाव घेतली आहे. धायरी परिसरात जून 2024 ते 19 जुलै 2024 या कालावधीत वारंवार घडला होता. युवतीने याला कंटाळून सिंहगड रोड पोलिसात धाव घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी युवकावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिपक प्रकाश गायकवाड याच्यावर कलम 74, 75, 78, 115, 352, 351(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पीडित युवती रस्त्यावरुन येत-जात असताना आरोपीने तिचा अनेकदा पाठलाग केला होता. त्याचबरोबर पीडित युवती धायरी येथील रोडवरुन जात असताना आरोपीने दुचाकीवरुन तिचा पाठलाग केला. दुचाकी आडवी लावून तीला थांबवण्याचा प्रयत्न केला. धायरी परिसरातील एका मंदिराजवळ दुचाकी आडवी लावून मुलीला गाडीवर बसण्यास सांगितले. मात्र तिने नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. तसेच तु माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्यावर ब्लेडने वार करीन. तु माझी नाही झाली तर मी मी कोणाचीच होऊ देणार नाही असे म्हणून शिवीगाळ करुन धमकी दिली. युवतीचा मोबाईल जबरदस्तीने घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.’

वाशिम हादरलं! चार बहिणींनी भावाच्या मैत्रिणीला दगडाने ठेचून मारलं…

पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंध, गर्भपाताचा प्रयत्न अन् चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं…

कोपरगाव हादरले! अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाचा खून…

महाराष्ट्र हादरला! शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या…

एकतर्फी प्रेमातून नगरसेवकाच्या मुलीची कॉलेजमध्ये हत्या…

एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप…

एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!