
पुणे शहरात ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहिम अन् वाहतूकीत तात्पुरता बदल…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात ३१/१२/२०२४ रोजी नुतन वर्ष आगमना निमित्त पुणे कॅम्प (लष्कर) व डेक्कन, शिवाजीनगर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवाय, वाहतुक शाखेतर्फे ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार असुन मद्य प्राशन करून वाहन चालविणा-या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती अमोल झेंडे (पोलिस उप आयुक्त, वाहतूक) यांनी दिली.
अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
पुणे शहरातील लष्कर (कॅम्प) भागातील महात्मा गांधी रस्त्यावर तसेच डेक्कन वाहतूक विभागांतर्गत फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर दिनांक ३१/१२/२०२४ रोजी वर्ष अखेर व नूतन वर्षारंभचे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर भागातील रस्त्यांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी वाढून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. याकरीता दि. ३१/१२/२०२४ रोजी १७.०० वा. पासून ते गर्दी संपेपर्यंत. तात्पुरत्या स्वरुपात खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. ते पुढील प्रमाणे…
महात्मा गांधी रोड, लष्कर (कॅम्प) परिसर…
१. वाय जंक्शन वरुन महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतुक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करुन ती कुरेशी मस्जिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
२. ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतुक ही बंद करण्यात येणार आहे.
३. व्होल्गा चौकाकडून महंमदरफी चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक सरळईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.
४. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक इंदिरागांधी चौकातून लष्कर पोलिस स्टेशन चौकाकडे वळविण्यात येईल.
५. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक ताबूतस्ट्रीट मार्गे पुढे सोडण्यात येईल.
फर्ग्युसन कॉलेज रोड व जंगली महाराज रोड…
१. फर्ग्युसन कॉलेज रोड :- कोथरुड / कर्वेरोडकडुन येणारी वाहतूक खंडोजीबाबा चौक या ठिकाणी बंद करुन लॉ कॉलेज रोड, प्रभात रोड व अलका टॉकीज चौक मार्गे वळविण्यात येईल.
२. जंगली महाराज रोड :- जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक, गुडलक चौक व इतर लेनमधुन फर्ग्युसन कॉलेज रोडकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेप्रमाणेझाशी राणी चौक या ठिकाणी बंद करुन पुणे महानगरपालिका, ओंकारेश्वर मंदिर व शिवाजी रोड मार्गे वळविण्यात येईल.
नो-व्हेईकल झोन (दिनांक ३१ / १२ / २०२४ रोजी १७.०० वा. ते दि. ०१/०१/२०२५ रोजी ०५.०० वा. )
१. फर्ग्युसन रोड :- गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट पर्यंत.
२. एम. जी. रोड :- १५ ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर .
३१/१२/२०२४ रोजी वाहतुक शाखेतर्फे ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार असुन मद्य प्राशन करून वाहन चालविणा-या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. सदर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करताना ब्लो पाईप ( प्लास्टिक पाईप ) एका व्यक्तिसाठी एक पाईप (युज ॲण्ड थ्रो)वापरण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये, असे आवाहन सर्वांना करण्यात येत आहे. उल्लघंन करणा-या इसमांवर कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
पुणे शहरामध्ये दिंनाक ३१.१२.२०२४ चे ००.०१ ते ०१.०१.२०२५ चे २४.०० वा दरम्यान सर्व प्रकारचे जड / अवजड वाहनांना ( ट्रक, डंपर, मिक्सर, बल्कर, जे.सी.बी. रोड रोलर, मल्टी एक्सल वाहनांसाठी ) खालील ठिकाणाच्या पुढे प्रवेश बंदी करण्यात येत आहे. सर्व वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन इच्छित स्थळी जावे.
१) थेऊर फाटा, लोणीकाळभोर पासुन पुढे २) हॅरीष ब्रिज, खडकी, ३) बोपखेल फाटा, विश्रांतवाडी
४) राधा चौक, बाणेर, ५) नवले ब्रिज, वारजे, ६) कात्रज चौक, कात्रज, ७) खडीमशीन चौक, कोंढवा,
८) मंतरवाडी फाटा, फुरसुंगी, ९) मरकळ ब्रिज पासुन पुढे प्रवेश बंद राहील.
तसेच संपुर्ण पुणे शहर पोलिस आयुक्तालया मध्ये दिंनाक ३१.१२.२०२४ चे ००.०१ ते ०१.०१.२०२५ चे २४.०० वा दरम्यान सर्व प्रकारचे जड / अवजड वाहनांना ( ट्रक, डंपर, मिक्सर, बल्कर, जे.सी.बी.रोड रोलर, मल्टी एक्सल वाहनांसाठी ) अंतर्गत वाहतूकी करीता सर्व रोडवरती प्रवेश बंदी करण्यात येत आहे. ( अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलिस वाहने,रुग्णवाहिका इ. वगळून )

पुणे शहरातील कात्रज चौकातील उड्डाण पुलाचे कामामुळे वाहतूकीत बदल…
निखील पिंगळे यांची गुन्हे शाखा उपायुक्तपदी नियुक्ती; अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभाग…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…


