
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 74वी एमपीडीएची कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार इम्रान जानी महंमद शेख (वय 26 रा. स्वामी बिल्डींग, कात्रज, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ही 74 वी कारवाई आहे.
इम्रान शेख हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयता, सुरा, पालघन यासारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीविताला व मालमत्तेला नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे त्याच्याविरोधात तक्रार देण्यास धजावत नव्हते.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत १०५वी कारवाई झाली आहे.
शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हेगारावार एमपीडीए अंतर्गत कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे ३६० दिवसात मोक्काचे शतक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

