
घाटंजी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; मुद्देमाल जप्त…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी शहरातील शिवाजी वार्डात घाटंजी पोलिसांनी धाड टाकून 7 आरोपी विरुद्ध गुन्हे नोंदवून 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या समक्ष करण्यात आली. या प्रकरणी संशयीत आरोपी सागर सुरेश पवार (वय 50, पंचायत समिती जवळ घाटंजी), अमर उर्फ अमोल दिलीप गेडाम (वय 25, इंदिरा आवास घाटी घाटंजी), अवधूत नन्नूसिंग जोधा (वय 38, आनंद नगर घाटंजी), अमोल मनोहर शेंडे (वय 31, विद्याभवन वार्ड घाटंजी), सुरज सुधाकर चौधरी (वय 32, आनंद नगर घाटंजी), शाहरुख अय्युब पठाण (वय 21, सुभाष वार्ड घाटंजी) व उमेश पांडुरंग मोहूर्ले (वय 35, दुर्गामाता वार्ड घाटंजी) यांचे विरुद्ध घाटंजी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक राजेश पंडित (वय 35) यांच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 705/2024 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी आरोपीता कडून रोख ₹ 700, मोबाईल व ॲक्टीवा मोपेड असा 40,000 रुपयांचा मुद्देमाल घाटंजी पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिस उप निरीक्षक राजेश पंडित व इतर पोलिस पथक घाटंजी पोलिस स्टेशनला तैनात असतांना गोपनीय माहितीच्या आधारे, शिवाजी वार्डातील सागर पवार यांच्या घरामागे काही ईसम 52 पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती घाटंजी पोलिसांना मिळाली. त्यावरून सदर माहिती स्टेशन डायरीत क्रमांक 28/2024 नोंद करुन घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर, पोलिस उप निरीक्षक राजेश पंडित, जमादार राहुल खंडागळे, पोलिस हवालदार दिनेश जाधव, पोलिस हवालदार नितेश छापेकर व पंच असे खाजगी वाहनाने लॅपटॉप, प्रिंटर सह जुगार खेळत असलेल्या ठिकाणी रवाना झाले. तेथे सागर पवारच्या घरामागे काही ईसम 52 पत्त्यांचा एक्का बादशाह नावाचा हार जितचा जुगार खेळ सुरू होता.
सदरची कारवाई घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर, पोलिस उप निरीक्षक राजेश पंडित, जमादार राहुल खंडागळे, पोलिस हवालदार दिनेश जाधव व पोलिस हवालदार नितेश छापेकर आदींनी केली. या छाप्यामुळे घाटंजी शहरात खळबळ माजली आहे.
धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…
नागपूरमध्ये ५५ वर्षाच्या व्यक्तीने चिमुकलीवर केला अत्याचार…
बलात्कार पीडितेचे नाव, फोटो शेअर केल्यास शिक्षा…
नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…
Video: अंबरनाथमध्ये कारने 5 जणांना ठरवून चिरडले…

