
सौदी अरेबियात बसचा भीषण अपघात, 42 भारतीयांचा आगीत होरपळून मृत्यू…
दुबईः सौदी अरेबियातील मदिना येथे बसला झालेल्या भीषण अपघातामध्ये 42 भारतीय नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडल्याची भीती व्यक्त केली आहे. हे सर्वजण हैदराबाद आणि तेलंगणा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
सौदीतील बद्र-मदिना महामार्गावर रविवारी रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार) हा अपघात झाला. याठिकाणी प्रवासी बस आणि एका डिझेल टँकरची जोरदार धडक झाली. ही धडक झाल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला. त्यामुळे प्रवाशांच्या बसला आग लागून त्यामधील प्रवाशी मृत्युमुखी पडले. या बसमध्ये मदिना येथे तीर्थयात्रेसाठी गेलेले भारतीय नागरिक होते.
मदिना यात्रा आयोजित करणाऱ्या टूर ऑपरेटरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 10 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. डिझेल टँकरला धडकल्यानंतर संपूर्ण बसने पेट घेतला. त्यामुळे आतमध्ये असलेल्या 42 भारतीय नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दाट शक्यता आहे. मक्का येथील दर्शन घेऊन हे सर्व भाविक मदिना येथे परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला. मृतांमध्ये 20 महिला आणि 11 लहान मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, सौदी अरेबियातील स्थानिक प्रशासनाकडून अद्याप 42 भारतीय प्रवाशांच्या मृत्यूला दुजोरा देण्यात आलेला नाही. सौदी अरेबियातील स्थानिक यंत्रणा आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, तपासणी आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेबाबत सौदी किंवा भारतीय सरकारकडून अद्याप मृतांच्या अधिकृत संख्येची घोषणा करण्यात आलेली नाही.
Video: पुणे शहरातील नवले पुलाजवळ नेमका कसा घडला अपघात, ८ जणांचा मृत्यू…
खासगी बसला मोटरसायकलने दिली धडक; 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू…
राजस्थानमध्ये एसी स्लीपर बसला आग; 20 जणांचा होरपळून मृत्यू…
ट्रकला लागेलल्या आगीत 30 शेळ्यांचा होरपळून मृत्यू; पोलिसकाका जखमी…
पुणे शहरात मध्यरात्री भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू…

