
हृदयद्रावक! चिमुकल्याला पाठीवर घेऊन आई धावत सुटली पण नको ते घडलं…
पुणे: आंबेगाव तालुक्यातील खेतेपठार येथे एका चिमुकल्याला रस्त्याअभावी आपला जीव गमवावा लागला आहे. आदित्य विकास घनकुटे (वय २) असे या चिमुकल्याचे नाव असून, त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी काळाने ही झडप घातल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आदित्यला सोमवारी सकाळी जेवताना अचानक ठसका लागून तो बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेणे गरजेचे होते. मात्र, खेतेपठार गावात पक्का रस्ताच नाही. अखेर आई सुनीता आणि आजी शारदा यांनी आदित्यला आपल्या पाठीवर घेतले पळत सुटल्या. डोंगरदऱ्याचा ४ किलोमीटरचा खडतर रस्ता पायी पार केला. तिथून पुढे दुचाकीवरून त्याला घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचाराला उशीर झाल्याने या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, खेतेपठार ते आमोंडी हा रस्ता वनविभागाच्या जाचक अटींमुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पावसाळ्यात कच्चा रस्ता वाहून गेल्याने येथील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. “जर वेळेत रस्ता आणि उपचार मिळाले असते, तर माझा मुलगा आज जिवंत असता,” अशी काळीज पिळवटून टाकणारी खंत वडील विकास घनकुटे यांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हृदयद्रावक! वाढदिवसच ठरला आयुष्यातला शेवटचा दिवस; यंत्रात स्कार्फ अडकला अन् गेला जीव…
हृदयद्रावक! डॉ. स्तुती सोनवणे यांनी लिहिलेली सुसाईड नोटमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख…
हृदयद्रावक! पोलिस भरतीसाठी सराव करताना काळाचा घाला…
हृदयद्रावक! एक नवविवाहित तर दुसऱ्या बहिणाचा विवाहापूर्वी अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! पत्नीला वाढदिवशीच समजली प्राध्यापक पतीच्या मृत्यूची बातमी…

