हृदयद्रावक! कन्येचा विवाह सोहळा पार पडला अन् बापावर काळाने घाला घातला…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): बेल्हे-जेजूरी राज्यमार्गावर झालेल्या अपघातात वधूपित्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लोणी (ता. आंबेगाव) येथील रहिवासी संदीप दत्तात्रय पोपळघट (वय ५0) यांचे अपघाती निधन झाले. त्यांची कन्या ऋतूजा पोपळघट (वय १८) ही जखमी झाली आहे.

संदिप पोपळघट यांचे मूळ गाव (देवी भोयरे-ता.पारनेर.जि.नगर) पण सध्या लोणी येथे राहात होते व पुणे या ठिकाणी खाजगी कंपनीत काम करत होते. त्यांची मोठी मुलगी अक्षदा पोपळघट हिचा विवाह शनिवार (ता. ३०) रोजी लोणी पाबळ रोडवरील थापेवाडी येथील माऊली मंगल कार्यालयात दुपारी दोन वाजता पार पडला. विवाह झाल्यानंतर सर्व धार्मिक विधी पार पाडल्यानंतर लग्न झालेल्या नवऱ्या मुलीची पाठराखण करण्यासाठी धाकटी मुलगी ऋतूजाला पाठवायचे होते. ऋतुजा वडीलांबरोबर लोणी येथील घरी कपड्याची बॅग आणण्यासाठी स्कुटी वरून लोणीच्या दिशेने जात असतना बांधनवस्ती या ठिकाणी गतिरोधक आला म्हणून दूचाकी वाहन सावकाश केली. त्याचवेळी पाठीमागून जोरात येणाऱ्या टेम्पोने जोरात धडक दिली. या धडकेत संदिप पोपळघट हे रस्त्यावर पडल्याने डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना प्रथम चाकण या ठिकाणी दवाखान्यात दाखल केले. तर मूलगी ऋतूजाचा एक पायाला फॅक्चर व दुसऱ्या पायाला मोठी दुखापत झाली आहे.

वडील संदिप पोपळघट यांच्यावर उपचार चालू असतानाच त्यांचे रविवारी (ता. ३१) पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मूली असा परिवार असून लोणी येथील माजी विद्यार्थी विकास प्रबोधनीचे चेतन लोखंडे यांचे ते मेव्हूणे होते. सुभाष पांडुरंग लोखंडे यांचे जावई होत, त्याच्या या अपघाती जाण्याने लोखंडे व पोपळघट परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नानंतर झालेल्या या प्रसंगाने परिसरात अत्यंत हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, त्याच वेळेला त्या ठिकाणी एका चार चाकी गाडीचा अपघात झाला. अपघात गाडीचे मोठे नुकसान झाले असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

बेल्हे ते जेजूरी या राज्य मार्गावर गेल्या चार पाच वर्षात अनेक मोठे अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रस्त्यावर शिक्रापूर त लोणी ३३ गतिरोधक असून या गतिरोधकांवर ठिकाणी सूचना फलक नसल्याने अपघात होतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावर सूचना फलक वाहतूक नियमांचे फलक बसवावेत, अशी मागणी लोणी चे सरपंच सावळा भाऊ नाईक व खडकवाडी चे माजी सरपंच आनिल डोके यांनी केली आहे.

हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…

हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक! दोन वाहनांच्या मध्ये चेंगरूण ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू…

हृदयद्रावक! आईने बहिणीला विहिरीत ढकलल्याचे मुलाने पाहिले अन्…

हृदयद्रावक! शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; वडिलांचा आक्रोश…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!