
थांबा! राम मंदिराच्या नावावर फ्री रिचार्जची लिंक आली आहे…
नवी दिल्लीः अयोध्येतील श्री रामजन्मभूमी येथे आज (मंगळवार) राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असून, संपूर्ण देशात आज उत्साहाचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे सायबर गुन्हेगार सक्रीय झाले आहेत. राम मंदिराच्या नावाखाली त्यांच्याकडून नागरिकांची फसवणूक सुरू झाली असून, फ्री रिचार्जची लिंक शेअर केली जात आहे. पण, यामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
सायबर गुन्हेगार नागरिकांच्या भावनांना हात घालून त्यांची आर्थिक फसवणूक करू लागले आहेत. देशातील विविध भागात अशी प्रकरणे समोर आली आहेत. रामाच्या नावाने फ्री रिचार्जची लिंक पाठवली असून, नागरिकांनी त्यावर क्लिक केले आणि त्यांचे पैसे गमावले आहेत. या पार्श्वभूमीवर फरीदाबाद पोलिसांनी नुकतीच एक सूचनाही जारी केली आहे.
दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘राम मंदिराच्या उद्घाटनाच्या नावाखाली लोकांना मोफत रिचार्ज करण्याचे आमिष दाखवले जात आहे. दुसरा मार्ग म्हणजे राम मंदिराच्या प्रसादाची मोफत होम डिलिव्हरी करणे, अशा आमिषाने एक लिंक पाठवली जाईल आणि त्यावर क्लिक करण्यास सांगितले जाईल. चुकूनही अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.’
सायबर चोर तुम्हाला एक लिंक देऊन त्यावर क्लिक करून तुमचे नाव, पत्ता आणि इतर काही माहिती भरण्यास सांगतील. ही माहिती नमूद करत असताना तुम्ही फसवणुकीचे बळी ठरू शकता. दिल्ली, मुंबई, हरयाणासह इतर राज्यातील पोलिसांनीदेखील सामान्यांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अयोध्येतील राम मंदिर व्यवस्थापनाने कोणालाही प्रसाद घरपोच करण्याचे अधिकार दिले नाहीत. कोणत्याही आमिषाला बळी न पडता कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा…
युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…
महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…
लष्करातून निवृत्त झालेल्या वृद्धाला अश्लिल व्हिडिओ कॉल अन्…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

