
हृदयद्रावक! मांजराने चावा घेतल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू…
नागपूर : मांजराने चावा घेतल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. श्रेयांशू क्रिष्णा पेंदाम (वय ११) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे श्रेयांशूच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
श्रेयांशू याच्यावर शनिवारी सांयकाळी मांजराने हल्ला केला होता. त्यानंतर त्याचा काही तासांतच मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगणा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हिंगणा तालुक्यातील उखळी गावात ही घटना घडली आहे. श्रेयांशू खेळत असताना त्याला शनिवारी सायंकाळच्या सुमारास मांजराने चावा घेतला. त्यानंतर त्याचा काही वेळातच मृत्यू झाला.
मांजराच्या चाव्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचं नेमके कारण समोर येणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! आईने बहिणीला विहिरीत ढकलल्याचे मुलाने पाहिले अन्…
हृदयद्रावक! शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; वडिलांचा आक्रोश…
हृदयद्रावक! तलावाजवळ मुलांची कपडे दिसली अन् फुटला हंबरडा…
हृदयद्रावक! गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने चिमुकलीचा मृत्यू…
हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…

