
महिला रात्री बेल वाजवून रडत असल्याची अफवा पसरली अन्…
भोपाळ (मध्य प्रदेश) : एक महिला रात्रीच्या सुमारास गल्लीमधील घरांच्या बेल वाजवून रडत बसल्याची अफवा परिसरात पसरल्यानंतर भितीचे वातावरण पसरले होते. पण, पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर महिलेचा शोध घेतला आणि माहिती समजली.
संबंधित महिला ग्वाल्हेरच्या चंदन नगरमधून आपल्या लिव्ह इन पार्टनरच्या शोधासाठी येथे आली होती. तिचा लिव्ह-इन पार्टनर विक्की शाक्य याच्यासोबत आपागंज भागात राहते. विकी शाक्य हा ग्वाल्हेरच्या घास मंडी येथील चंदन नगर येथील रहिवासी आहे. 8 जून रोजी या महिलेचे विकीसोबत भांडण झाले होते. त्यानंतर तो तिला सोडून गेला. यानंतर ती महिला तिचा लिव्ह इन पार्टनर विकीचा शोध घेण्यासाठी चंदन नगरमध्ये पोहोचली. मात्र, तिला विकीचे घर माहित नव्हते. यामुळे तिने अनेक घरांबाहेर जाऊन बेल वाजवली. मात्र, मध्यरात्री दारावरची बेल वाजल्याने भीतीपोटी लोकांनी दार उघडलं नाही. यानंतर एक महिला रात्री बेल वाजवून घराबाहेर रडत असल्याची अफवा परिसरात पसरली होती. महिला आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर विकी शाक्य यांची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी ही बाब उघड केली.
ग्वाल्हेरचे सीएसपी अशोक जदौन यांनी सांगितले की, ‘ग्वाल्हेर पोलिस स्टेशन हद्दीतील चंदन नगर येथील रहिवाशांनी तक्रार केली होती की, एक महिला रात्री त्यांच्या घराची बेल वाजते आणि रडते आणि त्यांना त्रास देते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलेची ओळख पटली. महिलेचे तिच्या प्रियकराशी भांडण झाले होते. महिलेला प्रियकराचं घर माहीत नसल्याने ती अनोळखी व्यक्तींना त्रास देत होती. रहिवाशांचे जबाब घेण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाला नाही, त्यामुळे कायदेशीर कारवाई केली जात नाही.’
नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…
हृदयद्रावक! एक तासापूर्वी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू…
‘कॉल गर्ल’च्या नावाने फोन करून युवकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला बेड्या…
क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेने संपत्तीसाठी काढला सासऱ्याचा काटा…
डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

