कोल्हापूर हादरले! मामानेच केली भाचीची अत्याचारानंतर हत्या; डोळा बाहेर…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिये येथे मामानेच १० वर्षीय भाचीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. बुधवारी बेपत्ता झालेल्या १० वर्षाच्या चिमुकलीचा गुरुवारी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. नराधम नातेवाईकानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे पोलिस तसापात समोर आले आहे. पीडित मुलगी बिहारच्या मजूर दाम्पत्याची आहे. या प्रकरणी आरोपी दिनेशकुमार साह याला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

बिहारमधील दाम्पत्य उदरनिर्वाहासाठी गेल्या तीन वर्षांपासून शिये येथे राहत आहे. बुधवारी सकाळी दाम्पत्य कामासाठी बाहेर गेले. तेव्हा पीडित मुलीच्या मामाकडे मुलांना सोपवून दाम्पत्य गेले होते. पण रात्री जेव्हा दाम्पत्य घरी परतले तेव्हा मुलगी घरात नसल्याचे दिसले. मामाने मुलगी न सांगता खेळायला गेल्याचे उत्तर दिले. दिनेशकुमारने पीडितेच्या इतर भावंडांना नारळ काढायला जात असल्याचे सांगून मोठ्या मुलीला घेऊन गेला होता. धक्कादायक बाब म्हणजे नराधमाने निर्जनस्थळी मुलीला नेत तिच्यावर अत्याचार केले. मुलीचा खून केल्यानंतर तो घरी येऊन रात्री कामासाठी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आल्यावर जिचा खून केला तिचा शोध घेण्यासाठी तोच सर्वात पुढे होता. मुलीच्या डोक्यावर गंभीर वार झाला होता. त्याने गळा आवळून खून केला. लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केली. यात तिचा एक डोळाही बाहेर आला होता. तर पाठीवर आणि हातावर मारहाणीचे व्रण होते.

पोलिसांनी डॉग स्कॉडची मदत घेत मुलीचा शोध सुरु केला. त्यानंतर घराच्यामागे असलेल्या उसाच्या शेतात घरापासून ८०० मीटर अंतरावर मुलीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले तेव्हा त्यात मुलीसोबत एक युवक जात असल्याचे दिसले. त्याने घातलेल्या कपड्यांवरून काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पीडित मुलीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. गळा आवळून आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तिची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहलावात समोर आले आहे.

पोलिसी खाक्या दाखवताच या नराधमाने आपला गुन्हा कबुल केला. आरोपी हा मृत मुलीच्या मामीचा भाऊ आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो मृत मुलीच्या घरात राहायला आला होता. अत्याचार केल्यानंतर मुलगी रडायला लागली. आपले बिंग फुटेल या भीतीने आरोपीने मुलीची हत्या केली. गुरुवारी सकाळी मुलीचा मृतदेह शेतात आढळला. पोलिसांनी अपघ्या पाच तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार, बेशुद्ध पडताच घटना उघड…

पुण्यातील स्कूल व्हॅन चालकाचा विद्यार्थिनीला मेसेज; तू मला आवडतेस…

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…

बलात्कार पीडितेचे नाव, फोटो शेअर केल्यास शिक्षा…

विकृती! कॅब चालकाने महिलेची छेड काढताना पॅंटची चेन उघडली अन्…

नागपूरमध्ये ५५ वर्षाच्या व्यक्तीने चिमुकलीवर केला अत्याचार…

Video: ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नाचणारे पोलिस कर्मचारी निलंबीत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!