
गोव्याला फिरण्यासाठी निघालेल्या पोलिसांनी केला युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न…
सिंधुदुर्ग : गोव्याला फिरण्यासाठी जात असताना वसई येथील पोलिसांनी वाटेत एका युवतीचा विनयभंग करून तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला. ही घटना लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी दोन पोलिसांसह पाच जणांना मारहाण केली, तसेच त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. देवगड पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
हरिराम मारोती गिते (वय 34) आणि प्रवीण रानडे (वय 32) अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ते वसई वाहतूक पोलीस शाखेत शिपाई पदावर कर्यरत आहेत. हे दोन्ही पोलीस कर्मचारी आपले मित्र माधव केंद्रे (वय 32), शंकर गिते (वय 32) आणि सतवा केंद्रे (वय 32) यांच्यासोबत रजा घेऊन सहलीसाठी गोव्याला निघाले होते. याचदरम्यान देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील आनंदवाडी वळणार एक 18 वर्षांची महाविद्यालयीन युवती तिच्या घराकडे एकटी जात होती. ती एकटी असल्याचे पाहून पोलिसांनी तिचा विनयभंग केला. या मुलीने झालेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. आरोपींनी मुलीचा हात धरून तिला वाहनात खेचत पळून नेण्याचा प्रयत्न केला.
मात्र ही घटना तेथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने ग्रामस्थ गोळा झाले. स्थानिकांनी आरोपींना बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सायबर क्राइम! पिंपरी-चिचंवड पोलिसांना जयपूरमध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न…
ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसकाकाचा लोकलमधून पडून मृत्यू….
सासू-सासऱ्यांनी धावत्या एसटीमध्ये जावयाचा आवळला गळा…
पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…
पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

