तुळजापूरला देवदर्शनाला निघालेल्या चार मित्रांचा जागीच मृत्यू…

लातूर : नांदेडहून तुळजापूरला देवदर्शनासाठी निघालेल्या मित्रांच्या मोटारीला भीषण अपघात झाला. या अपघातात चार मित्र जागीच ठार झाले असून, एक गंभीर जखमी झाला आहे. लातूर-नांदेड महामार्गावर महाळंग्रा शिवारात रविवारी (ता. ३) पहाटे ३ वाजता हा अपघात झाला.

लातूर-नांदेड महामार्गावर अपघातात मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मांडके, नर्मन कात्रे या चार मित्रांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, चौघेही तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मोटारीने मित्र शनिवारी रात्री निघाले होते. ते महाळंग्रा शिवाराजवळ पोहोचले असताना कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून जोराची धडक दिली आणि अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.

मोटार नर्मन कात्रे हा चालवत होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्यानंतर ट्रॅक्टरला मागून जोराची धडक बसली. यात नर्मनसह मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मांडके यांचा जागीच मृत्यू झाला. शुभम लंकाढाई हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर लातूरमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, चार मित्रांच्या अपघाती मृत्युमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

सोलापूरमध्ये दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा अपघाती मृत्यू…

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांचा अपघाती मृत्यू…

बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू…

भीषण अपघात! दोन सख्ख्या भावांसह पाच मित्रांचा जागीच मृत्यू…

बीडमध्ये भीषण अपघातात पाच जागीच ठार; गावावर शोककळा…

नगर-कल्याण महामार्गावर अपघातात दहा ठार; संपूर्ण कुटुंबच संपलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!