ब्लिंकइटच्या मुंबईतील गोदामात झुरळे व मुदतसमाप्ती झालेला माल व कीड लागलेली मिठाई…

मुंबई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) राज्यभरात ठिकठिकाणी छापे घालण्याचे सत्र चालूच असून, मुंबईत आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. एफडीएने मुंबईतील ब्लिंकइटच्या एका युनिटचा अन्न परवाना निलंबित केला असून, रिलायन्स रिटेलच्या एका आउटलेटचीही चौकशी चालू आहे.

एफडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना अस्वच्छता आणि झुरळांचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदींचे हे स्पष्ट उल्लंघन आहे.

दरम्यान, मुंबईतील मालाड येथील सर्वोदय भवनमधील ब्लिंकइटच्या गोदामातद अन्न सुरक्षेचे गंभीर उल्लंघन आढळून आल्यानंतर कडक कारवाई करण्यात आली. एफडीएने ७ ऑगस्ट रोजी केलेल्या तपासणीत गोदामात प्रचंड घाण, झुरळांचा मोठा प्रादुर्भाव, खाद्यपदार्थांची अयोग्य साठवणूक, कोल्ड स्टोअरेजमधील अस्वच्छता, मुदत संपलेले आणि छेडछाड केलेले पाकिटबंद अन्न आणि नियमांचे पालन न केल्याचे उघड झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!