
टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ग्रुप करायचे अन् लुटायचे…
पाटना (बिहार) : एकाच गावातील काही मुले महादेव बुकींग अॅप चालवत होते. या माध्यमातून ते अडीच लाख लोकांचा टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप तयार करुन गेम खेळायचे आणि वेळ मिळताच मोठी गुंतवणूक केलेल्या व्यक्तीचे बँक खाते साफ करायचे. पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई करत तीन सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे.
बिहारच्या सिहरसा जिल्ह्यात ही घटना समोर आली. पोलिसांनी काशनगरच्या मौरा चोक येथून या आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून 4 मोबाइल, 2 एटीएम, 3 पासबुक, 3 चार चाकी वाहन, 5 सिमकार्ड आणि एक वायफाय राऊटरही जप्त केले असून, पुढील तपास करत आहेत. सायबर डीएसपी अजीत कुमार यांनी सांगितले, ‘सोनवर्षा राज पोलिस ठाणे हद्दीतील काशनगर ओपी अंतर्गत वाहनांची तपासनी केली जात होती. यादरम्यान, एक चारचाकी वाहन संशयास्पद वाटले त्यामुळे या वाहनाला थांबविण्यात आले. मात्र, पोलिसांना पाहताच कारमधील एक जण पळून गेला. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. यानंतर कारमधील इतर तीन मुलांना अटक करण्यात आली. रविराज उर्फ दिलखुश मेहता, माणिकचंद कुमार आणि पंकज कुमार अशी या अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिस तपासात त्यांनी धक्कादायक माहिती दिली. पोलिस तपासात ही सर्व मुले सायबर गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण महादेव बुक गेमिंग अॅप चालवतात. तीनही आरोपी हे बसनही पोलिस ठाणे हद्दीतील जमुनिया गावातील रहिवासी आहेत. यामध्ये रविराज हा आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. याआधी त्याला अटक करण्यात आली होती.
आरोपींनी टेलिग्राम आणि व्हाट्सअपवर ग्रुप बनवले होते. यामध्ये अडीच लाख लोक होते. हे सर्वजण गेमच्या नावावर चुकीचे किंवा दुसऱ्या लोकांचे अकाऊंटचा आयडी क्रिएट करत होते आणि त्यांच्यासोबत गेम खेळायचे. सुरुवातीला ते जिंकत असल्याचे दाखवून त्यांना काही पैसेही द्यायचे. पण जेव्हा लोक जास्त पैसे गुंतवायचे, तेव्हा हे सर्वजण त्या समोरच्या व्यक्तीची मोठी आर्थिक फसवणूक करायचे. याबाबतचा पोलिस पुढील तपास करत आहेत.
सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा…
युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…
पोलिस आयुक्तांच्या नावानेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट…
थांबा! राम मंदिराच्या नावावर फ्री रिचार्जची लिंक आली आहे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

