
‘बिग बॉस’ फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा!
दुबई : ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोझिक याचा साखरपुडा पार पडला आहे. अब्दु रोझिकने 9 मे 2024 रोजी इंस्टाग्रामवर एक घोषणा केली होती. 7 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचे त्याने म्हटले होते. त्यानंतर 10 मे 2024 त्याने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. फोटोमध्ये अब्दु आपल्या होणाऱ्या पत्नीला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहे. त्यामुळे तो सध्या चर्चेत आहे.
‘बिग बॉस 16’मध्ये अब्दु रोझिक झळकला होता. बिग बॉसच्या माध्यमातून अब्दु भारतात चांगलाच लोकप्रिय झाला. या कार्यक्रमात अनेकदा त्याने प्रेम आणि एकटेपणाबद्दल भाष्य केले आहे. अब्दुची उंची 3 फुट असल्याने एकही मुलगी त्याच्यासोबत लग्न करण्यात तयार नव्हती. पण, अब्दु लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
अब्दु रोझिकने इंस्ट्रग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अब्दु एका मुलीला अंगठी घालताना दिसत आहे. फोटो शेअर करत अब्दुने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,”Allhamdulillah 24.04.2024″. याचा अर्थ की अब्दुने अमीरासोबत 24 एप्रिल 2024 रोजी साखरपुडा केला आहे”. अब्दु आणि अमीराचा साखरपुडा दुबईत पार पडला आहे. दुबईतच त्यांचे लग्नदे होणार आहे. अब्दुने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो त्याच्या पारंपारिक ड्रेसमध्ये दिसून येत आहे. अब्दुच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटी कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. अब्दुचा फक्त दुबईतच नव्हे तर संपूर्ण भारतभर मोठा चाहतावर्ग आहे.
View this post on Instagram
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ…
अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीचा मोठा गौप्यस्फोट…
‘कुमकुम भाग्य’फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप…
अभिनेत्रीने केली मैत्रिणीच्या घरी मोठी चोरी अन् गेली गोव्याला…
हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप…

