
पुणे! बंडगार्डन पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; मोकामधील आरोपी जेरबंद…
पुणे : शिवाजीनगर पोलिस स्टेशन मधील मर्डर मोका अंतर्गत दाखल गुन्ह्यातील 02 वर्षापासून पाहिजे व बंडगार्डन पोलिस स्टेशन बलात्कार गुन्ह्यातील आरोपीस जेरबंद करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले आहे.
बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी बाबत तपास पथकाचे पो उप निरी स्वप्निल लोहार, अंमलदार ज्ञाना बडे, मनोज भोकरे व मनिष संकपाळ यांना गोपनीय बातमी प्राप्त झाली होती. सदर आरोपीस पुणे धायरी सिंहगड या ठिकाणी सापळा लावून ताब्यात घेण्यात आले आहे. विशाल लक्ष्मण भोले (रा. तेरा ताडीवाला रोड, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याचा सहभाग निष्पन्न झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सदरची कारवाई अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर राजेंद्र बनसोडे, पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 मिलिंद मोहिते, साहाय्यक पोलिस आयुक्त लष्कर विभाग अतुल कुमार नवगिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलिस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत व पोलिस निरीक्षक निळकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शितोळे, पो.हवा सारस साळवी, प्रकाश आव्हाड, अमित सस्ते, पो.शि ज्ञाना बडे, मनिष संकपाळ, शिवाजी सरक, मनोज भोकरे, महेश जाधव, अमित सस्ते शिवाजी राणे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.
पुणे! पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…
पुणे! दरोडेखोरांकडून वॉकी-टॉकीचा वापर; १२०० किलोमीटरपर्यंत माग काढत केली अटक…
Video: पुणे शहरातून भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; टोळीचा पर्दाफाश…
पुणे रेव्ह पार्टीत जावयाला अटक, एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया…
पुणे! तळजाई टेकडीवर ‘भावी’ पोलिसांना बेदम मारहाण…

