पोलिसकाकाच्या पत्राने पोलिस दलात उडाली खळबळ…
अहमदनगर : पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत दोन दिवसात पदोन्नतीची यादी न बदलल्यास आत्महत्या करेन, असे पत्र पोलिसकाकाने लिहिले असून, या पत्रामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये रामनाथ भाबड हे हेड कॉन्स्टेबलपदी कार्यरत आहेत. दोन दिवसांत प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचे निवेदन पोलिस अधिक्षकांना दिले आहे. शिवाय, पोलिस महासंचालक, विशेष […]
अधिक वाचा...Video: युवतीसोबत डान्स करणं होमगार्डला पडलं महागात…
मुंबईः लोकल ट्रेनमध्ये एका युवतीसोबत होमगार्डला डान्स करणे महागात पडले आहे. युवतीसोबत डान्स करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित गार्डवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. युवतीच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली पण होमगार्डला नोकरी गमवावी लागली आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर एक होमगार्ड कर्मचारी युवतीसोबत लोकल ट्रेनमध्ये नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. […]
अधिक वाचा...राज्यात होणार 23 हजार 628 पोलिस शिपयांची पदभरती: गृहमंत्री
नागपूर : राज्यात लवकरच 23 हजार 628 पोलिस शिपयांची पदभरती होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) विधानपरिषद लक्षेवेधीवेळी दिली. गृह विभागातील पोलिस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यात 23 हजारांपेक्षा […]
अधिक वाचा...पोलिसकाकाचा अमेरिकेत डंका! 40 अंडी, एक किलो चिकन…
जालना : जालन्यातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर किशोर डांगे यांनी लॅटिन अमेरिका येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्यामुळे डांगे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कन्हैयानगर सारख्या झोपडपट्टी एरिया मध्ये राहणारे डांगे यांनी 16 वर्षांपासून शरीरसौष्ठव करत आहेत. पोलिस दलातील नोकरी सांभाळून त्यांनी आपला छंद जोपासला आहे. त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि […]
अधिक वाचा...संदीप कर्णिक यांनी स्वीकारला नाशिक पोलिस आयुक्तपदाचा पदभार!
नाशिक: पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी शुक्रवारी (ता. २४) नाशिकच्या पोलिस आयुक्त पदाचा पदभार तत्कालीन आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून स्वीकारला. सर्वप्रथम त्यांनी नाशिकचे ग्रामदैवत कालिका मंदिरात जाऊन दर्शन घेत आयुक्तालयात प्रवेश केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनियुक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, ‘तत्कालीन आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिकमध्ये चांगले काम केले आहे. यापुढे वाहतुकीसह कायदा आणि सुव्यवस्थेचे […]
अधिक वाचा...पुणेकरांची मनं जिकली! संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त!
पुणे (संदीप कद्रे) : पुणे शहरचे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्याचे आदेश गृहविभागाने मंगळवारी (ता. २१) सायंकाळी दिले. नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) मुंबई कार्यालयात विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप कर्णिक यांनी पावणेदोन वर्ष सहपोलिस आयुक्तपद भूषविले होते. गणेशोत्सव बंदोबस्तासह महत्वाच्या बंदोबस्ताची […]
अधिक वाचा...पोलिसकाकाने मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणानंतर केली आत्महत्या…
मुंबईः मैत्रिणी सोबत झालेल्या भांडणातून पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरळी पोलिस वसाहत येथे घडली आहे. इंद्रजित साळुंखे असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. दोन वर्षापूर्वी मुंबई पोलिस दलात भरती झालेला इंद्रजित साळुंखे हा नायगाव मुख्यालय येथील शस्त्रास्त्र विभागात तैनात होता. इंद्रजित साळुंखे याचे गोरेगाव येथे राहणाऱ्या एका युवती सोबत प्रेमप्रकरण सुरू होते. इंद्रजित […]
अधिक वाचा...महिला हवालदाराला REEL बनवणे आले अंगलट…
लखनौ (उत्तर प्रदेश): आरती सोलंकी या महिला हवालदाराला REEL बनवणे आले अंगलट आले असून, पोलिस अधीक्षकांनी त्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. कासगंज येथील आरती सोलंकी रिलमुळे चर्चेत आल्या आहेत. सरकारी अधिकारी, कर्मचारीही रिल्स बनवत असतात. काहीजण कार्यालयात असतानाही व्हिडीओ बनवतात. काम करणे सोडून रिल्स बनवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. आरती […]
अधिक वाचा...अमरावतीमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्याला वाळूच्या ट्रकने चिरडलं…
अमरावती: अमरावती शहरातील बियाणी चौकात ट्रक चालकाने महिला पोलिस अधिकाऱ्याला चिरडले असून, त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. अमरावती शहरातील बियाणी चौकात रेतीचा ट्रक व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सहाय्यक पोलिस अधिकारी प्रियंका कोटावार यांचा डावा पाय निकामी झाला आहे. अपघात इतका भयानक होता […]
अधिक वाचा...पोलिस झाले हायटेक! आरोपींच्या शरीरावर बसवले जीपीएस; पळाला तरी…
श्रीनगरः आरोपी तुरुंगातून सुटताना त्याच्या पायाच्या घोट्यात जीपीएस यंत्रणा बसण्याचा निर्णय जम्मू-काश्मिर पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे आरोपीच्या सर्व हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष रहाणार आहे. असे तंत्रज्ञान वापरणारे जम्मू-कश्मीर देशातील पहिले राज्य ठरले आहे. आरोपी जामीन किंवा पॅरोलवर असताना फरार होण्याची चिंता राहणार नाही. अतिरेकी कारवायात सामील असलेल्या आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी खास […]
अधिक वाचा...
