
ग्रामसेवकाने वाईट उद्देशाने धरला महिलेचा हात अन् म्हणाला…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील मांडवा हेटी येथे एका 40 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी अपराध क्रंमाक 04/2025 भारतीय न्याय संहिता कलम 75 अन्वये ग्रामपंचायत अधिकारी विष्णू सरकुंडे विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार व पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे हे पुढील तपास करीत आहे.
मांडवा हेटी येथील एका 40 वर्षीय महिला व त्याचा भाऊ दिलीप साठे (वय 39 वर्ष, रा. हेटी मांडवा) व फिर्यादी यांनी सोबत जाऊन जबानी रीपोर्ट दिला कि, मांडवा हेटी येथील एक 40 वर्षीय महिला ही पती गजानन किसन भोंगाडे (वय 45 वर्ष) व आपल्या कुटूंबासह राहत असून रोजमजुरी करते. मांडवा हेटी या गावात विष्णु नथूजी सरकुंडे, (वय 40 वर्ष रा. घाटंजी) हा बरेच वर्षा पासून ग्रामसेवक म्हणून कार्यरत असुन तो दारु पिण्याचा सवईचा आहे. मागील 1 वर्षा पासून हा ग्रामसेवक फिर्यादीला वाईट नजरेने पाहत असतो, असे तक्रारीत नमुद आहे. तसेच ग्रामसेवक हा फिर्यादी सोबत बोलण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो.
मांडवा हेटी या गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने फिर्यादी व गावातील स्त्री पुरुष मागील 4 दिवसांपासुन मांडवा हेटी या गावात अंगणवाडी समोरुन रस्ता व्हावा म्हणून उपोषणाला बसले होते. दिनांक 02 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 05.30 वाजता फिर्यादी व गावातील स्त्री व पुरुष असे गावातील अंगणवाडी समोर रस्त्यासाठी उपोषणाला बसून असतांना गैरअर्जदार ग्रामसेवक विष्णु नथुजी सरकुंडे हा फिर्यादी जवळ आला व जवळ बोलावून म्हणाला की, तुम्हाला रस्ता खुला करुन पाहिजे असेल तर माझ्या सोबत कोप-यात चल, असे म्हणून फिर्यादीचा वाईट उद्देशाने हात पकडला व मी तुमच्या गावचा रस्ता करून देतो असे फिर्यादीला म्हणाला. तेथे बाजुला हजर असलेले मांडवा हेटी येथील दिगांबर अवथळे यांनी सदर कुसबुज ऐकल्याने ग्रामसेवक विष्णु सरकुंडे यांना तुम्ही असे कां बोलत आहे, असे म्हणून फिर्यादीने त्याच्या गालावर चापट मारली. उपोषणस्थळी वाद वाढू नये म्हणून फिर्यादी सोबत असलेले पुरुष व महिला यांनी गैरअर्जदार विष्णु सरकुंडे यांना गावाच्या बाहेर घेवुन गेले.
02 जानेवारी 2025 रोजी रात्र झाल्याने व मांडवा हेटी गावातून रात्रीला येण्यासाठी रस्ता नसल्याने फिर्यादीने दिनांक 03 जानेवारी 2025 रोजी घाटंजी पोलिस स्टेशनला रिपोर्ट दिला. दिनांक 03 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 05.30 वाजता सुमारास फिर्यादी व इतर गावकरी मांडवा हेटी गावातील अंगणवाडी समोर उपोषणाला बसुन असतांना गैरअर्जदार विष्णु नथुजी सरकुंडे याने तुम्हाला रस्ता खुला करुन पाहिजे असेल तर माझ्या सोबत कोप-यात चल, असे म्हणून फिर्यादीचा वाईट उद्देशाने हात पकडला व मी गावचा रस्ता करुन देतो, असे म्हटल्याने फिर्यादी च्या मनात लज्जा ऊत्पन्न झाल्याने ग्रामसेवक विरुद्ध योग्य कार्यवाही करण्यात यावे या करीता घाटंजी पोलिस स्टेशनला रिपोर्ट दिला, अश्या जबानी रिपोर्ट वरून विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार व पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे हे पुढील तपास करित आहेत.
नाशिकच्या रुग्णालयातून एमबीए महिलेने चोरलं बाळ; कारण…
Video: पोलिस अधिकऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य…
धक्कादायक! पत्नीला पाच युवकांसोबत रंगेहाथ पकडले अन् पडला रक्ताचा सडा…
नवी मुंबईतील दोघांची राहत्या घरातील हत्या समलैंगिक संबंधातून…
भोंदूबाबा महिलेला काही टेन्शन घेऊ नकोस असं म्हणाला अन् खोलीमध्ये गेल्यावर…

