
संतापजनक! तिसरी मुलगी झाल्याने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवलं…
परभणी: तिसरी ही मुलगीच झाल्याच्या रागातून संतापलेल्या नवऱ्याने पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार गंगाखेड नाका परिसरात घडला आहे. महिलेने जीव वाचविण्यासाठी धावताना घरासह दोन दुकाने जळून खाक झाली आहेत. या धक्कदायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
तिसरी ही मुलगीच झाल्यामुळे नवरा पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करत होता. नवऱ्याने गुरूवारी रात्री आठच्या दरम्यान पत्नी मैना कुंडलिक काळे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. पत्नीला परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान मृत महिला मैना काळे या पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर पडताना आणि दुकानात शिरतानाचे धक्कादायक असे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. एवढ्या क्रूरपणे आपल्या पत्नीचा जीव घेणाऱ्या कुंडलिक काळे विषयी सध्या प्रचंड मनस्ताप व्यक्त केला जात आहे. यातील क्रूर पती कुंडलिक काळे यांच्याविरोधात कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, या संतापजनक घटनेनतर परिसातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आईचा मृत्यू तर बाप कारागृहात गेल्यामुळे मुलींवर अनाथ होण्याची वेळ आली आहे.
संतापजनक! महिलेवर अमानुषपणे बलात्कार अन् शरीरात ठोकले खिळे…
संतापजनक! 2 वर्षीय मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाटणं घुसवलं अन् मारलं…
संतापजनक! शिक्षकानं आधी विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवला अन्…
संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…
संतापजनक! मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी युवतीवर केला बलात्कार अन् पुढे…

