साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…

सातारा : साताऱ्यातील लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणाला नवा ट्विस्ट प्राप्त झाला आहे. न्यायाधिशांना पाच लाखाच्या लाच प्रकरणात सहाय्य करणाऱ्या इतर तिघा आरोपींपैकी एक पोलिस अधिकारी असल्याचे समोर आले आहे. आरोपी किशोर खरात हे सहाय्यक पोलिस निरिक्षक असल्याचे तपासात उघड झाले आहे.

किशोर खरात हे मुंबई पोलिस खात्यात कार्यरत असून वरळी येथे ते कार्यरत आहेत. न्यायाधीश धनंजय निकम यांची पाच लाखांची लाच घेण्याच्या प्रक्रियेत किशोर खरात यांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. धनंजय निकमसह चौघांचा काल सातारा जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता. परिणामी या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.

दरम्यान, आरोपीस जामीन मिळवून देण्यासाठी चक्क न्यायाधीशांनीच लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यातून समोर आला होता. विशेष म्हणजे एसीबीने रंगेहात पकडल्याने हा भांडाफोड झाला. साताऱ्यातील सत्र न्यायालय परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये न्यायाधीशांसह आणखी तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. आरोपींच्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला असता, सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी न्यायाधीश महोदयांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे, लाच घेणाऱ्या न्यायाधीश महोदयांना न्यायालयानेच फटकारल्याचे दिसून आले आहे.

सर्वसामान्यांच्या न्याय-हक्काचे ठिकाण म्हणून न्यायालयाकडे पाहिले जाते. पोलिसांकडून अन्याय झाल्यानंतरही न्यायालयात न्याय मिळेल, अशी भावना सर्वसामान्यांची असते. मात्र, न्यायाधीश महोदयच लाच घेताना रंगेहात पकडल्यामुळे न्यायपालिकेवरही शंका उपस्थित झाली. तसेच, न्यायालयाच्या कामकाजाला धक्का पोहोचवण्याचे काम न्या. निकम यांच्या कृत्याने केले. मात्र, त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकातील लाच घेणारे पाच अधिकारी निलंबीत…

महावितरणच्या कर्मचाऱ्याने 5 लाख रुपयांची लाच मागितली

लाच घेतल्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा व 12 हजार द्रव दंड…

क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात मोठं घबाड; दागिने अन् नोटांची थप्पी…

शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरात मिळालं घबाड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!