पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री अडचणीत; ईडीकडून सात तास चौकशी…

मुंबईः पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठ वादात सापडली आहे. पॉर्नोग्राफी नेटवर्कशी जोडलेल्या मनी लॉड्रींग प्रकरणात गेल्या आठवड्यात गहना वशिष्ठ हिच्या घरी ईडीची धाड पडली होती. सोमवारी ही अभिनेत्री ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली. तेथे तिची ईडीकडून सात तास चौकशी झाली आहे.

अभिनेत्री गहना हीचे नाव पॉर्नोग्राफी प्रकरणाशी जोडले गेले आहे. साल २०२१ साली पहिल्यांदा तिचे नाव या प्रकरणात समोर आले होते. गेल्या आठवड्यात तिच्या घरी छापे पडले होते. त्यात अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. आता या प्रकरणात तिची चौकीशी झाली आहे. तिला आज (मंगळवार) पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर व्हावे लागणार आहे.

अभिनेत्री गहना वशिष्ठ हिची गेल्या आठवड्यात सात बॅंक खाती फ्रीज करण्यात आली होती. तसेच दोन मोबाईल फोन आणि अनेक डॉक्युमेंट्स जप्त करण्यात आले होते. गहना हिच्या आधी राज कुंद्राला देखील समन्स जारी करण्यात आले होते आणि चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. परंतू त्यांनी थोडा वेळ मागितला होता. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा यांना अटक झाली होती. त्याच वेळी गहना या प्रकरणी वादात सापडली. त्याच वेळी तिच्या अडचणी वाढल्या होत्या.

दरम्यान, गेल्या आठवड्यात राज कुंद्रा, गहना वशिष्ठ आणि अन्य लोकांच्या घरी छापेमारी झाल्यानंतर ईडीच्या हाती जे पुरावे मिळाले. त्याच आधारे ईडी पॉर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणाशी जुळलेल्या मनी लॉण्ड्रींगचा तपास सुरू आहे.

राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ईडीचा दणका; कोट्यावधींची संपत्ती जप्त…

पुणे शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह दोन मॉडेल…

अभिनेत्री रविना टंडन हिने नशेत केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितले…

आम्ही वेगळे झालोय! अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र याचे ट्विट…

पोर्न स्टार रिया बर्डे हिला पोलिसांनी केली अटक; धक्कादायक कारण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!