पुणे पोलिसांनी चुहा गँगचा कुख्यात टोळीप्रमुख व त्याच्या साथिदारांना हत्यारांसह केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): चुहा गँगचा कुख्यात टोळीप्रमुख व त्याच्या साथिदारांना मेफेड्रॉन (एम.डी.), पिस्टल, इतर हत्यारांसह जेरबंद करण्यात आंबेगाव पोलिस स्टेशनच्या पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पोलिस आयुक्त यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोबींग ऑपरेशन व गुन्हे प्रतिबंधक चे अनुषंगाने गस्त करणेबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने आंबेगाव पोलिस स्टेशनचे हददीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस अधिकारी मोहन कळमकर हे तपास पथकासह संतोषनगर परीसरात गस्त घालत होते. खास बातमीदामार्फत माहिती मिळाली की, डिलाईट बेकरीसमोर, संतोषनगर, कात्रज, पुणे येथे काही जण हे हत्यारासह दरोडयाच्या उद्देशाने येणार आहेत.

area-37
वरील बातमीप्रमाणे माहिती मिळताच सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला. काही वेळातच बातमी प्रमाणे काही व्यक्ती सदर ठिकाणी आले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे…

१) तौसीफ जमीर सय्यद उर्फ चुहा वय-२८ वर्षे, रा. जामा मस्जीदचे बाजुला, संतोषनगर, कात्रज पुणे.
२) सुरज राजेंद्र जाधव वय-३५ वर्षे रा. मंगळवार पेठ, ता करमाळा, जि सोलापुर.
३) मार्कस डेव्हिड इसार वय-२९ वर्षे रा. रघुनंदन अपार्टमेन्ट, धानोरी पुणे.
४) कुणाल कमलेश जाधव वय-२५ वर्षे पवन स्विट होम शेजारी, सोमनाथ नगर, वडगाव शेरी पुणे.

आरोपींच्या ताब्यातून एकुण १३,७१,१२०/ रुपये किंमतचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये रु.०३,००,०००/- रुपयांचे १५ ग्रॅम वजनाची पिवळसर रंगाची पावडर स्वरुपातील मेफेड्रॉन रु.४०,५००/- रुपये किंमतीचा एक पिस्टल व एक जिवंत राउंड, ०४,८०,०००/- रुपये मेफेड्रॉन (एम.डी) विक्री करुन मिळवलेली रोख रक्कम, एक लोखंडी कोयता, दोन टुव्हिलर व एक फोर व्हिलर कार तसेच इतर हत्यारासह अनाधिकाराने, बेकायदेशीररित्या गुन्हा करण्याचे उद्देशाने विक्री करीता बाळगुन व दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना मिळुन आले आहे. म्हणुन त्यांचे विरुध्द भारती विद्यापीठ पो स्टे, गुन्हा रजि नं.९९७/२०२४ बी.एन.एस कलम ३१०(४), २२३, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ४(२५), एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम २२ (क), २९, म.पो.अधि.कलम ३७ (१) (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल केला असून, त्यामध्ये वर नमुद चारही आरोपींना अटक केली आहे.

सदर आरोपींपैकी आरोपी तौसीफ उर्फ चुहा हा गेल्या सहा महिन्यापासून भारती विद्यापीठ पोलिस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी असून त्यास न्यायालयाने दोन वर्षाकरीता हद्दपार केले आहे. आरापी तौसीफ सय्यद उर्फ चुहा याचेवर मोक्का, जबरी चोरी, खंडणी, अंमली पदार्थ विक्री, जिवे ठार मारणे असे विविध १५ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, रंजनकुमार शर्मा, पोलिस सह आयुक्त, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर, स्मार्तना पाटील, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ-२ पुणे शहर, राहुल आवारे, सहाय्यक पोलिस आयुक्त साो, स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलिस स्टेशनकडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, प्रियंका गोरे सपोनि, तपास पथकाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर, सुरेश शिंदे, पोलिस अंमलदार शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, अविनाश रेवे, बाबासो पाटील, निलेश ढमढेरे यांचे पथकाने केली आहे.

Video: पुणे ग्रामीण पोलिसांनी स्मशानभुमी मधील लाकडावरुन उघड केला खुनाचा गुन्हा…

पुणे शहरात वर्गातच विद्यार्थ्याने चिरला काचेच्या तुकड्याने गळा…

पुणे शहरातील फरासखाना तपास पथकाची उल्लेखनीय कामगीरी…

पुण्यातील IT इंजिनिअरकडून उकळले तब्बल सहा कोटी उकळले…

पुणे शहरात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेची मोठी कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!