
पोलिसकाकाची जिममधून आल्यावर प्रकृती बिघडली अन् घेतला जगाचा निरोप…
लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूरमधील काकादेव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका उपनिरीक्षकाचा गुरुवारी (ता. २४) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पोलिस कर्मचारी जिममध्ये वर्क आऊट करून घरी परतला. दूध प्यायल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने पत्नी आणि त्याच्या साथीदाराने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
विष्णू कुमार शर्मा (वय ३९, रा. आलमपूर) यांचा मृत्यू झाला आहे. ते काकादेव पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. पी रोडवरील विजय टॉवर अपार्टमेंटमध्ये ते पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास विष्णू वर्कआऊट करून जिममधून घरी आले. घरी आल्यावर पत्नीने त्यांना एक ग्लास दूध दिले. दूध पिल्यानंतर छातीत तीव्र वेदना आणि जळजळ होत असल्याचे सांगितले. पतीची तब्येत बिघडल्याने शेजारी राहणाऱ्यांना माहिती दिली. त्यांना तत्काळ डॉक्टरांकडे नेण्यात आले. परंतु, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
दरम्यान, उपनिरीक्षक विष्णू कुमार शर्मा २०२० मध्ये कानपूरच्या सिसमऊ पोलिस स्टेशनमध्ये तैनात होते. तेव्हापासून ते जवाहरनगर चौकीचे प्रभारी होते. १६ ऑक्टोबर रोजी विष्णूची काकादेव पोलिस ठाण्यात बदली झाली होती.
पोलिसकाकाचे ऑन ड्युटीवर असतानाच हृदयविकाराने निधन…
Video: पोलिसकाकाने ‘ऑन द स्पॉट’ लावला चोरट्यांचा निकाल…
पोलिसकाकाला चालकाने फरफटत नेलं अन् चिरडलं; जागीच मृत्यू…
ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसकाकाचा लोकलमधून पडून मृत्यू….
नागपूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसकाकाचा मृत्यू…
पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप; कुटुंबियांना धक्का…

