दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडले तीन जणांना…

पुणे (संदिप कद्रे): अंभोरा पोलिस स्टेशन (जि. बीड) व पाथर्डी पोलिस स्टेशन (जि. अहमदनगर) या दोन पोलिस स्टेशनकडील दिड महिन्यांपासून पाहिजे असलेल्या दरोडयाच्या गुन्ह्यातील ०२ आरोपी व ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक यांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १, गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

आगामी विधानसभा २०२४ चे अनुषंगाने पोलिस आयुक्त यांनी गुन्हे अभिलेखावरील तडीपार/पाहिजे/फरारी तसेच आर्म अॅक्ट च्या केसेस करणेबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील अधिकारी व अंमलदार असे गस्त करीत असताना गस्ती दरम्यान स्टाफमधील पोलिस अंमलदार ८७३२ साईकुमार कारके यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अंभोरा पोलिस ठाणे, जि. बीड, भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), ३१०(५) मधील निष्पन्न पाहिजे आरोपी
१) रोहित वाघमारे (रा. वारजे माळवाडी, पुणे), २) शुभम धनवटे (रा. श्रीरामपुर, जि. अहमदनगर), ३) शुभम डोक (रा. नन्हे, पुणे) हे कै. रमेश वांजळे नावाचे मंगल कार्यालय, उत्तमनगर, पुणे चे समोर सार्वजनिक रोडवर उभे असल्याची खात्रीशीर बातमी प्राप्त झाली होती. सदरची बातमी वपोनि नंदकुमार बिडवई, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांना कळविली असता त्यांनी वरील नमुद निष्पन्न पाहिजे आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन कारवाई करण्याचे आदेशित केले होते.

पोलिस उप निरीक्षक शाहीद शेख व स्टाफ असे मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावूनवरील पाहिजे आरोपींचा शोध घेतला असता नमुद वर्णनाचे तीन जण हे सदर ठिकाणी दिसून आल्याने सदर ठिकाणी स्टाफचे मदतीने सापळा रचुन नमुद तीन जणांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी १) रोहित गुरुदत्त वाघमारे, वय- २९ वर्षे, मुळगाव- माळीचिंचोरा, ता. नेवासा, जि. अहमदनगर, सध्या रा. यशोदिप चौक, चौधरी बिल्डींग, वारजे माळवाडी, पुणे, २) शुभम चांगदेव धनवटे, वय- २० वर्षे, मुळगाव- वडाळा महादेव, पाण्याच्या टाकीजवळ, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर, सध्या रा. अहिरे गेट, गणराज कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं १०९, उत्तमनगर, पुणे असे सांगितले व ३) ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक यांचेकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच तपासी अंमलदार यांनी पाथर्डी पोलिस स्टेशन, अहमदनगर, गुन्हा रजि नं. ८५०/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६) व वाढीव कलम भारतीय न्याय संहिता कलम ३१० (२) या दाखल गुन्ह्यात सुध्दा त्यांचा सहभाग असल्याचे सांगितले. नमुद आरोपींना पुढील कारवाईकरीता अंभोरा पोलिस ठाणे, जि. बीड यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलिस उप आयुक्त गुन्हे, निखिल पिंगळे, सहा.पोलिस आयुक्त, गुन्हे १ गणेश इंगळे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलिस उप निरीक्षक शाहीद शेख, पोलिस हवालदार धनंजय ताजणे, गणेश ढगे, बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, अजित शिंदे, इरफान पठाण, दत्तात्रय पवार, मनिषा पुकाळे, पोलिस नाईक रविंद्र लोखंडे, पोलिस अंमलदार साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, अमित गद्रे, शिवाजी सातपुते, अक्षय गायकवाड, नारायण बनकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

पुणे शहरातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी…

पुणे शहरात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथका १ ची धडाकेबाज कारवाई…

पुणे शहरातील खुनाच्या प्रयत्नातील आरोपींच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये…

पुणे शहरात रेकार्डवरील सराईत गुन्हेगारास पिस्टल व काडतुसह युनिट २ कडून जेरंबद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!