
पुणे शहरातील सोमवार पेठ पोलिस लाईनचा शतक मोहोत्सव!
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सोमवार पेठ पोलिस लाईन शताब्दी मोहोत्सव समिती, पुणे चे वतीने सोमवार पेठ पोलिस लाईन शतक मोहोत्सव आज (रविवार) सायंकाळी पाच वाजता साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, चंद्रकांत उर्फ चंदू बोर्डे माजी क्रिकेट कप्तान भारत टिम हे उपस्थित राहणार आहेत.
सोमवार पेठ पोलिस लाईन येथे पूर्वी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या व राहिलेल्या ज्यांचे बालपण तरुणपण या लाईनीमध्ये गेले आहे. परंतू, आता ते इथे रहात नाहीत अशा व सध्या लाईनीमध्ये रहात असलेल्या मित्रांसाठी हा बिगर राजकीय कौटुंबीक सांस्कृतीक कार्यक्रम साजरा होत आहे. या कार्यक्रमामध्ये सोमवार पेठ पोलिस लाईन येथे पूर्वी राहिलेले व जीवनामध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या व्यक्तीमत्वांचा सत्कार करण्यात येणार आहे. सोमवार पेठ पोलिस लाईन ही पोलिस कर्मचाऱ्यांचे राहण्याकरीता स्वातंत्र्यापूर्वी 1924 साली त्यावेळेसचे बांधकाम खाते, मुंबई इलाखा यांनी तयार केलेली पोलिस वसाहत आहे.
पोलिस वसाहतीमध्ये सुमारे 20 लाईन्स व 192 इतक्या खोल्या होत्या. सुमारे 1976 च्या सुमारास या वसाहतीतील पाहिल्या चार लाईनी, आडव्या चार व शेवटच्या चार लाईनी पाडण्यात येवून तेथे नव्या 4 मजले असलेल्या 8 ईमारती बांधण्यात आल्या आहेत. नवीन इमारतीसाठी पाडण्यात आलेल्या लाईनीतील कुटुंबांचे भवानी पेठ पोलिस लाईन व स्वारगेट पोलिस लाईन येथे पुनर्वसन किंवा राहण्याची सोय करण्यात आली होती. साधारण: पोलिस खात्यामध्ये भरती झालेनंतर लाईनीतील खोलीची मागणी केल्यानंतर पोलिस खात्यातील नोकरी असेपर्यत निवृत्ती पर्यत या लाईनीतील खोल्यामध्ये रहाता येते. जर एखाद्या पोलिसाचा मुलगा पोलिसमध्ये भरती झाला असेल तर ती खोली तो पोलिस खात्याच्या परवानगीने वडील सेवानिवृत्त झालेनंतर कायम वापरु शकतो असे अनेक कुटुंब लाईनीतील खोल्यामध्ये रहातात. काही खोल्यांमध्ये तर गेल्या तीन पिढया पोलिस कर्मचारी रहात आहेत.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या या वसाहतीमध्ये अनेक जातींची, धर्माची, वंशाची कुटुंबे गुण्यागोविंदाने एकत्र रहातात. संपूर्ण पोलिस लाईन एक कुटुंब असते. एकमेकांचे सण साजरे करणे, एकमेकांच्या कौटुंबीक व सामाजीक कार्यात एकत्र येवून कार्यक्रम साजरे करणे हे या लाईनीचे वैशिष्ठ आहे, असा सामाजीक व जातीय सलोखा एकत्ररित्या आपल्याला फक्त पोलिस लाईनीमध्ये दिसून येतो. अशा या वैशिष्ठ्यपूर्ण सोमवार पेठ पोलिस लाईनीचा शतक मोहोत्सव होत असल्याचे महाराष्ट्रामध्ये पहिलीच वेळ आहे. भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे याची प्रचिती आपल्याला पोलिस लाईनीमध्ये
दिसून येते.
स्थळ : सोमवार पेठ पोलिस लाईन, पुणे.
दिनांक : २० ऑक्टोबर
वेळ : साडेपाच वाजता
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

