
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
पुणे (संदिप कद्रे): पुजाऱ्याला किडनॅप करून कर्नाटक येथे डांबून ठेवून ५ कोटी खंडणी मागणाऱ्या सराईत आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी कनार्टक येथे जावून पुजाऱ्याची सुखरूप सुटका केली असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरबाबत अधिक माहिती अशी की, २९/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते ३०/९/२०२४ रोजी दरम्यान आरोपी
१) रामु अप्पाराय बळुन, रा. त्रिकुंडी, ता. जत, रा.सांगली,
२) दत्ता शिवाजी करें, रा.सदर
३) हर्षद सुरेश पाटील, रा.आसंगी, ता. जत, जि.सांगली व त्यांचे साथीदार हे फिर्यादी यांचे घरी आले होते. फिर्यादीचा मुलगा पुजारी स्वप्निल यांस भेटून विजापुर, कर्नाटक येथे घराची पूजा करायची आहे असे आमिष दाखवून, कर्नाटक येथे स्वप्नील लांडे, शुभम लांडे व त्यांचे सोबतचे शिष्य कृष्णा पांढरे, कन्हैया पांढरे, विशाल शेजवळ, पार्थ बेगुले, श्रीकांत सुतार व रोहन केंद्रे यांना घेवून जावून पिस्तुल व हत्यारांचा धाक दाखवून किडनॅप करून ५ कोटीच्या खंडणीसाठी त्यांना डांबून ठेवून ठेवल्याचे तक्रारीवरून बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १४०(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे.
संबंधित तपास करीत असताना तपास पथकाला आरोपी यांनी पुजारी व त्याचे शिष्यांना कर्नाटक येथे सिंधनूर जवळ डांबून ठेवले असल्याची खात्रीशीर माहिती तपास पथकाचे प्रभारी पोउपनि अशोक येवले, पोशी सुमीत ताकपरे व जोतीष काळे यांना मिळाली. त्यावरून वपोनि मंगल मोढवे यांनी तात्काळ सदरबाबत माहिती वरिष्ठांना कळवून लागलीच तपास पथकाचे प्रभारी पोउपनि अशोक येवले यांचेसह पोशी सुमीत ताकपरे व जोतीष काळे यांना रवाना केले.
सिंधनूर, कर्नाटक येथे पोहचल्यानंतर स्थानिक पोलिसांची मदत घेवून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी गेले असता आरोपी यांनी पुजारी व त्याचे शिष्यांना एका निर्जन ठिकाणी असलेल्या बंद रूममध्ये डांबून ठेवल्याचे दिसून आहे. आरोपी यांच्याकडे वेपन असल्याचे दिसून आले तरीदेखील वरील पथकाने त्यांच्या जीवाची पर्वा न करता घरास घेरा घालून रुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरामध्ये आरोपी व पोलिसांमध्ये झटापट झाली त्या झटापटीमध्ये आरोपी पळून जात असताना पोउपनि येवले, पोशि ताकपेरे व पोशि काळे यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना हत्यारासह ताब्यात घेवून पुजारी व त्याच्या ३ शिष्यांची सुखरूप सुटका केली. तसेच आरोपींनी आणखीन ४ शिष्यांना दुसरीकडे डांबून ठेवले होते त्यांची देखील शिताफीने सुटका केली. सदर आरोपी यांनी किडनॅप करण्याकरीता वापरण्यात आलेली बंदूक व इतर हत्यारे ताब्यात घेवून त्यांना बिबवेवाडी पोलिस ठाणे येथे आणून त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करून गुन्हयात अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी यांनी सोलापूर, सातारा, सांगली याठिकाणी गुन्हे केले असून फरार असल्याचे निष्पन्न केले. आरोपींनी दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोजकुमार लोंढे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त, अमितेशकुमार, सह पोलिस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त, मनोज पाटील, पोलिस उप-आयुक्त, आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, सहा पोलिस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मंगल मोढवे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), मनोजकुमार लोंढे, तपास पथकाचे प्रभारी पोलिस उप-निरीक्षक, अशोक येवले, पोलिस अमंलदार संजय गायकवाड, संतोष जाधव, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, प्रणय पाटील, शिवाजी येवले, विशाल जाधव, नितीन कातुर्डे, अभिषेक धुमाळ यांनी केली आहे.
बोपदेव घटनेतील आरोपींनी सापडू नये म्हणून कशी केली पोलिसांची दिशाभूल पाहा…
पुणे शहरात पुन्हा हिट ऍण्ड रन, ऑडी कार चालकाने युवकाला चिरडले…
पुणे शहरात चोरी करणाऱ्याच्या विश्रांतवाडी पोलिसांनी लातूरमध्ये जाऊन आवळल्या मुसक्या…
प्रेयसीच्या चिमुकल्याने उलटी केल्याने खून; बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा केला उघड…
बिबवेवाडी पोलिसांनी मोक्यातील टोळी प्रमुख फरार आरोपीस केले जेरबंद…

