
हनिमूनच्या रात्री नवऱ्याबाबत समजली खरी माहिती अन् तिने थेट…
लखनौ (उत्तर प्रदेश): बरेलीमध्ये एका नवीन लग्न झालेल्या मुलीला हनिमूनच्या रात्रीच पतीबाबत खरी माहिती समजल्यानंतर तिने थेट माहेर गाठले. वडिलांना सगळी हकीकत सांगितल्यावर त्यांनी लग्न ठरवणाऱ्या मध्यस्थांना बोलावून घेतलं व त्यांना खोलीत डांबून ठेवले आणि मारहाणही केली. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
बरेलीमधल्या सीबीगंज परिसरात ही घटना घडली आहे. बिथरी चैनपूरमध्ये राहणाऱ्या मध्यस्थांच्या सांगण्यावरून मुलाचे लग्न गावातल्या मुलीशी झाले होते. मात्र, हनिमूनच्या रात्रीच मुलगा नपुंसक असल्याचे समजले आणि नवरीने थेट माहेर गाठले आहे. दोघांचे 28 सप्टेंबर रोजी लग्न झाले होते; मात्र आपला मुलगा अगदी व्यवस्थित असून, त्याला कोणतीही समस्या नाही असे घडलेल्या प्रकाराबाबत मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे. सुनेने असे का म्हटले हे माहीत नाही. सुनेचा आरोप खोटा आहे, असे मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे.
हनिमूनच्या रात्रीच मुलगा नपुंसक असल्याचे समजल्याचा आरोप मुलीने केला आहे. माहेरी गेल्यानंतर युवतीने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. मग वडिलांनी मध्यस्थांना घरी बोलावले. त्यांना मारहाण करून घरात डांबून ठेवले. पोलिसांना माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले व मध्यस्थांना सोडवले. या प्रकरणात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पीडितांकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची पोलिस चौकशी करत असून, दोन्ही बाजूच्या व्यक्तींची संपूर्ण चौकशी करून मगच पुढची कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हनिमूनची रात्र अन् नवरदेवाला आलेला पत्नीचा संशय ठरला खरा…
युवतीने केली 13 दिवसांमध्ये 3 लग्न अन् हनिमूनच्या वेळी…
हनिमूनच्या रात्री समजलं की नवरा समलिंगी अन् पुढे…
हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…
हनिमूनच्या रात्री नवरदेव लागला मोठ-मोठ्याने ओरडायला…

