पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा मृत्यू; सुसाईड नोट मिळाली…

पाटणा (बिहार) : भागलपूरच्या पोलिस लाइनमध्ये 13 ऑगस्ट 2024 रोजी पोलिस कॉन्स्टेबल नीतू कुमारीच्या क्वार्टर नंबर-सीबी-38 मध्ये पाच जणांचे मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट हस्तगत केली आहे. यामध्ये अनैतिक संबंध आणि भांडणांमधून ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कॉन्स्टेबल नीतूचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत होता. तिच्या डोक्यावर, चेहऱ्यावर व शरीराच्या इतर भागांवर हल्ल्याच्या खुणा होत्या. तिच्या शेजारी दोन मुलं आणि नीतूच्या सासूचा मृतदेह होता. त्यांचे गळे चाकूने चिरल्याच्या खुणा होत्या. जमिनीवर रक्ताचा सडा होता. त्यानंतर पोलिस दुसऱ्या खोलीत गेल्यावर त्यांना नीतूच्या पतीचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला.

धक्कादायक! पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा गेला जीव…

पोलिसांना मृतदेहाजवळच एक सुसाइड नोटही होती. ही सुसाइड नोट नीतूच्या पतीनेच लिहिली होती. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘नीतूने माझी आई आणि दोन्ही मुलांचे खून केले. यानंतर रागाच्या भरात मी नीतूवर विटेने वार केले आणि नंतर चाकूने भोसकून तिची हत्या केली. माझं सगळं जग उद्ध्वस्त झालं, मी जगून काय करणार? मी ही मरायला जात आहे.’ दरम्यान, सुसाइड नोटमुळे स्पष्ट झाले, की आधी नीतूने मुलं व सासूची हत्या केली. त्यानंतर नीतूच्या पतीने तिचा खून केला आणि पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या सुसाइड नोटमध्ये कॉन्स्टेबल नीतू कुमारीचे कोणाशी तरी विवाहबाह्य संबंध असल्याचा उल्लेख केला आहे. आता पोलिस त्याचा तपास करत आहेत. कारण या प्रकरणात आणखी काही गोष्टी समोर येऊ शकतात.

डीआयजी विवेकानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘2015 बॅचची कॉन्स्टेबल असलेल्या नीतू कुमारीचे घर आतून बंद होते. 13 ऑगस्ट रोजी सकाळी दूधवाला आला; पण दार उघडले नाही, त्यामुळे त्याने व शेजाऱ्यांनी दाराला धक्का दिल्यानंतर घटना उघडकीस आली. शेजारी राहणाऱ्यांकडे चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. नीतूचा पती पंकज बेरोजगार होता. दोघांचे लव्ह मॅरेज झाले होते. घरात नीतू एकमेव कमावणारी होती. पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत होती. नीतू ही मूळची बक्सरची होती. तिची बदली भागलपूरला झाली होती, त्यामुळे ती कुटुंबासोबत येथे राहत होती. काही काळापासून या दोघांमध्ये रोज भांडणं होत होती. पंकजला नीतूचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. नीतू व पंकज यांचे मोबाइल तपासासाठी पाठवण्यात आले आहेत.’

Video: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या पोलिसांनी दाऊदला घटनास्थळी नेले अन्…

अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…

अनैतिक संबंधाला कटाळून महिलेची आत्महत्या; हातावर लिहीले की…

प्रेमात पडलेल्या दोघांच्याही जीवनाचा अखेर शेवट झाला…

अजब घटना! पती नोकरीनिमित्त बाहेरगावी अन् पत्नीने केला १२ वेळा गर्भपात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!