
अनैतिक संबंधाला कटाळून महिलेची आत्महत्या; हातावर लिहीले की…
इंदुर (मध्य प्रदेश): इंदूर शहरातील एका महिलेने नवऱ्याच्या अनैतिक संबंधाला कंटाळून हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
महिलेला तिचा पती आणि त्याची मैत्रीण त्रास देत होते. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तथापि, तेजाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी मृत महिलेचा पती आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
तेजाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्व्हर स्प्रिंग सोसायटीत राहणाऱ्या कविता पंकज पाटील (वय 40) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. कविताचा मृतदेह सोमवारी दुपारी घरात दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळला. कविता हिने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर सुसाईड नोट लिहिली. या नोटमध्ये तिने पंकज आणि त्याची मैत्रीण नम्रताच्या नावाचा उल्लेख करत त्या दोघांना मृत्युसाठी जबाबदार धरावे असे लिहिले होते. कवितानं मराठी आणि हिंदी भाषेत काही मजकूर लिहिला होता. त्यात तिने लिहिलं होतं की, `माझा पती पंकज आणि नम्रता यांच्यात खूप घट्ट नातं आहे. या कारणावरून माझा पती मला रोज मारहाण करत होता. पती आणि त्याच्या प्रेयसीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे.’
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या त्रासाला कंटाळून कविताने आत्महत्या केल्याचे सुसाईट नोटवरून दिसत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आत्याने भाच्यासोबत ठेवले अनैतिक संबंध अन् गरोदरानंतर मिळाली मोठी शिक्षा…
महिलेची अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या अन्…
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय अन् एक दिवस…
वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा…
पुणे जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पतीचा खून…

