
पुणे जिल्ह्यात मित्राला जमिनीत खड्डा करुन पुरले; पोलिसांनी घेतला शोध अन्…
पुणे (संदिप कद्रे): सिंहगड रोड पोलिस स्टेशन कडील मिसिंग व्यक्तीस डोंगरात खड्डा करुन गाडणाऱ्या आरोपींस ताब्यात घेवुन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सिंहगड रोड पोलिस स्टेशन, पुणे शहर मनुष्य मिसींग रजिस्टर क्रमांक १३३ / २०२४ दिनांक २३/०७/२०२४ मधील मिसींग व्यक्ती बसवराज पुरवंत मंगळुरे (मॅगिनमनी), वय २२ वर्ष रा. जाधवनगर, गल्ली नंबर १, निराकुंज बिल्डींग शेजारी, वडगाव बु. पुणे मुळ गाव मु पो तोळनुर, ता अक्कलकोट, जि सोलापर याचे तपासामध्ये बसवराज मंगळुरे हा त्याचा मित्र सौरभ रेणुसे (रा. मु पो पाबे, ता. वेल्हा, जिल्हा पुणे) याचेसोबत दि. १२/०७/२०२४ रोजी भाl लावणीसाठी पाबे गावी गेला होता. १३/०७/२०२४ रोजी बसवराज मंगळुरे हा मित्र सौरभ रेणुसे व रुपेश येणपुरे यांचेसोबत मु.पो रांजणे ता. वेल्हा, जिल्हा पुणे याठिकाणी टॉवरवर चढुन तार एक्सा ब्लेडने कापत असताना तार तुटल्यामुळे बसवराज मंगळुरे हा टॉवर वरुन खाली जमिनीवर पडला. सौरभ रेणुसे, रुपेश येणपुरे यांनी बसवराज यास उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये न नेता रा. मु पो पाबे, ता. वेल्हा, जिल्हा पुणे येथील पाबे घाटाजवळील जमिनीत खड्डा करुन पुरले अशी माहिती प्राप्त झाली.
प्राप्त माहीतीच्या अनुषंगाने सिंहगड रोड पोलिस ठाणे कडील पोउपनि निंबाळकर, पोउपनि भांडवलकर, पोउपनि जायभाय, व इतर पोलिस स्टाफ यांनी रुपेश येणपुरे, सौरभ रेणुसे यांचेसह मु पो. पाबे, ता. वेल्हा, जिल्हा पुणे याठिकाणी जावुन स्थानिक पोलिसांची मदत घेतली. मयुर बनसोडे, निवासी नायब तहसीलदार, तालुका वेल्हा जि पुणे यांचेसमक्ष सौरभ रेणुसे याने दाखविलेल्या ठिकाणाची जमीन उकरली असता, सदर ठिकाणी बसवराज मंगळुरे हा गाडलेल्या अवस्थेत मिळून आला. दाखल मनुष्य मिसींगचे तपासामध्ये मिसींग व्यक्ती बसवराज मंगळुरे यास सौरभ रेणुसे याने भात लावणीसाठी गावी नेवुन, नंतर मिसींग व्यक्ती बसवराज मंगळुरे, मित्र सौरभ रेणुसे, रुपेश येणपुरे असे मु पो रांजणे, ता वेल्हा, जि. पुणे येथे एमएसईबीचे टॉवरची तार चोरणेसाठी गेले असताना, सौरभ रेणुसे, रुपेश येणपुरे यांनी बसवराज मंगळुरे यास टॉवरवर तार कापण्यासाठी पाठविले. बसवराज मंगळुरे हा टॉवरवरुन खाली पडला. त्यावेळी त्यास सौरभ रेणुसे, रुपेश येणपुरे यांनी उपचारकामी हॉस्पीटलमध्ये न नेता, मु पो. पाबे, ता वेल्हा, जि पुणे येथील पाबे घाटातील जंगलात खड्डा करुन पुरलेबाबत निष्पन्न झाले.
सदर घटनेबाबत बसवराज मंगळुरे याची आई श्रीदेवी पुरवंत मंगरुळे (मॅगिनमणी) वय ४० वर्ष रा. मु पो तोळणूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापुर (मयताची आई) यांनी आरोपी नामे – १. रुपेश अरुण येनपुरे, वय २५ वर्ष रा. मु पो पाबे, ता. वेल्हा, जिल्हा पुणे २) सौरभ बापू रेणुसे, वय २५ वर्ष, रा. मु पो पाबे, विठ्ठलवाडी ता. वेल्हा, जिल्हा पुणे यांचेविरुध्द दिले तक्रारीवरुन सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजिस्टर क्रमांक ००/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०५, २३८, ३०३ (२), ६२, ३ (५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरचा प्रकार वेल्हा पोलिस स्टेशन हदीत घडला असल्याने, गुन्हा पुढील तपासकामी वेल्हा पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण यांचेकडे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास वेल्हा पोलिस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, रंजणकुमार शर्मा, पोलिस सह आयुक्त पुणे शहर, मा.प्रविण कुमार पाटील, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर संभाजी कदम, पोलिस उपआयुक्त परीमंडळ -३, श्री अजय परमार, सहा पोलिस आयुक्त, सिंहगडरोड विभाग आनंदराव खोबरे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, राघवेंद्र क्षीरसागर सोो, पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलिस उप निरीक्षक संतोष भांडवलकर, सुरेश जायभाय, निकेतन निंबाळकर, पोलिस अंमलदार, सतिश नागुल, सुहास गायकवाड, सचिन गायकवाड, नवनाथ वणवे, शिवाजी क्षिरसागर, राजाभाऊ वेगरे, उत्तम तारु, यांचे पथकाने केली आहे.
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
नितेश राणे यांनी भर सभेत दिली थेट पोलिसांना धमकी; म्हणाले…
राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
निखील पिंगळे यांची गुन्हे शाखा उपायुक्तपदी नियुक्ती; अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभाग…

