
हिमालयात ट्रेकर्सच्या ग्रुपची वाट चुकली; 5 जणांचा मृत्यू….
उत्तरकाशी (उत्तराखंड): हिमालयातील उत्तरकाशी येथे गिर्यारोहणासाठी गेलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील २२ जणांच्या ग्रुपपैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून चौघे अद्याप बेपत्ता आहेत. १३ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. खराब हवामानामुळे वाट चुकल्यानंतर पाच गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. २२ जणांच्या ग्रुपमध्ये कर्नाटकमधील १८ तर महाराष्ट्रातील एक महिला आहे.
उत्तरकाशीतील कुशलकल्याण सहस्रताल या हिमालयातील उंच ठिकाणी गिर्यारोहण करण्यासाठी २२ जणांचा ग्रुप गेला होता. ते अडकल्याची माहिती समजताच भारतीय हवाई दलाने हेलिकॉप्टरने बुधवारी मदतकार्य राबवले. यात पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले. अद्याप अडकलेल्या चार जणांचा शोध सुरू असल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली. मणेरी येथील २२ जणांचा गिर्यारोहकांचा ग्रुप २९ मे रोजी उत्तरकाशीपासून ३५ किमीवर असलेल्या ट्रेकसाठी गेला होता.
बचावकार्यात बाहेर काढण्यात आलेल्यांपैकी जे आजारी आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गिर्यारोहक जिथे अडकले होते ते ठिकाण ४१०० ते ४४०० मीटर उंच होते. गिर्यारोहकांचा ग्रुप ७ जूनला परतणार होता. पण त्याआधीच बेस कॅम्पपासून सहस्रताल येथे जाताना गिर्यारोहक रस्ता चुकले. या बचावकार्यात वनखात्याचे पथक आणि एसडीआरएफचे जवान कार्यरत आहेत.
भीषण अपघात! वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात; 13 जणांचा मृत्यू…
गुजरातमध्ये गेम झोनमध्ये भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

