प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट; सुसाईड नोटमध्ये पत्नीविषयी लिहीले…

भोपाळ (मध्य प्रदेश): प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उजैनमध्ये घडली आहे. सात वर्षांच्या मुलामुळे हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

बडनगरमधील नयापूरमध्ये अमित आचार्य (वय ३०) याने सोमवारी (ता. 3) पत्नी शिखा हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर बाथरूममध्ये जाऊन आपल्या हाताची नस कापली. यामुळे त्याचाही मृत्यू झाला. अमितच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, दोघांचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा लवित सात वर्षांचा आहे तर धाकटी मुलगी मैत्री दोन वर्षांची आहे. शिखा अमितचा मानसिक छळ करत होती. शिखाशी भांडण झाल्यानंतर अमित काही दिवसांपूर्वी झाबुआ येथे आला होता. आईने समजवल्यावर तो आईसह नयापूरला आला. मंगळवारी सकाळी नातू लवित आरडाओरडा करत त्यांच्याकडे धावत आला. आपले आई-वडील प्रतिसाद देत नसल्याची माहिती त्याने आजीला दिली. मंजू देवी धावत वरच्या मजल्यावरील खोलीत गेल्या तेव्हा सून आणि मुलगा दोघेही मृत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांना जवळच एक सुसाईड नोटही सापडली आहे. त्यात लिहिले होते की, माझी पत्नी शिखा आचार्य हिने माझं आणि माझ्या कुटुंबाचं जीवन कठीण करून ठेवलं आहे. घरात रोज भांडणं होतात, त्यामुळे माझा मानसिक छळ होत आहे. मी आणि आईने अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली; पण मदत मिळाली नाही. आता मी खूप त्रस्त आहे. त्यामुळेच मी माझ्या पत्नीची हत्या करून आत्महत्या करत आहे.’

संतापजनक! वडिलांच्या मृतदेहाशेजारीच मुलीने प्रियकरासोबत ठेवले शारीरिक संबंध…

हृदयद्रावक! डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून 8 पानी पत्र लिहून घेतला जगाचा निरोप…

प्रेमापोटी मेव्हणीला दिला महागडा मोबाईल गिफ्ट अन् पुढे…

मामाच्या मुलीसाठी सख्ख्या भावांची हाणामारी; पण तिचं प्रेम…

मेव्हणी आणि दाजीचे प्रेमसंबंध अन् महिन्यातच नवऱ्याचा खून…

प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह अन् पुढे…

त्रिकोणी प्रेमकथा! मुलीचे एकाच वेळी दोघांशी प्रेमसंबध अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!