
गुजरातमध्ये गेम झोनमध्ये भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू…
अहमदाबाद (गुजरात): राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये शनिवारी (ता. २५) संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
काही मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. DNA च्या आधारे या मृतदेहांची ओळख पटवली जाणार आहे. मृतांच्या कुटुंबीयांचे DNA सँपल घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राजकोट गेम झोनमधील आग नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीची परिस्थिती मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गेमझोनमध्ये आग लागल्यानंतर व्हिडिओमध्ये गोंधळ दिसून येतो. वरच्या मजल्यावर मुलं खेळत होती आणि खाली आग लागली होती. मुलांचे पालक त्यांना वाचविण्यासाठी धावत असल्याचे दिसत आहे.
राजकोट गेम झोनमधील शेडमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंग करताना ठिणगी पडल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राजकोट गुन्हे शाखेने सुमारे 10 जणांना ताब्यात घेतलं आहे. गेम झोनचा मालक युवराज सिंह सोलंकी आणि दोन व्यवस्थापक यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. व्यवस्थापक यज्ञेश पाठक, नितीन जैन यांच्यासह 10 जणांना ताब्यात घेतले आहे.
गेमझोनमध्ये एकूण 35 ते 40 लोक काम करत होते. गेम झोनमध्ये 1500 ते 2000 लिटर डिझेल जमा केले होते. गो-कार्ट रेसिंगसाठी 1000 ते 1500 लिटर पेट्रोलचाही साठा करण्यात आला होता. दरम्यान, गेम झोनमध्ये प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी 6 ते 7 फुटांचे एकच गेट होते. विशेष बाब म्हणजे शनिवारी गेम झोनमध्ये 99 रुपयांत प्रवेश देण्याची योजना लागू करण्यात आली होती. वीकेंड ऑफरमुळे गेम झोनमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…
भाविकांच्या बसला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू…
बांगलादेशमध्ये भीषण आगीत ४३ जणांचा होरपरळून मृत्यू…
हृदयद्रावक! घराला लागलेल्या आगीत अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

