
हनिमूनच्या रात्रीच नवरीने दाखवला खरा चेहरा…
लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाल्यानंतर नवरीने हनिमूनच्या रात्रीच घरातील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाल्यानंतर खळबळ उडाली होती. नवरदेवाच्या कुटुंबियांनी तात्काळ तक्रार दाखल केली होती. मुझफ्फरनगर पोलिसांनी लुटेरी दुल्हन गँगचा पर्दाफाश करत सात जणांना अटक केली असून, मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
मुझफ्फरनगर जिल्ह्यातील टिटवी पोलिस ठाण्यातील खेडी दुधाधरी गावातील रहिवासी बादल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली. उत्तराखंडमधील उधम सिंह येथे राहणाऱ्या बादल निक्कीसोबत त्याचा विवाह 1 मार्च रोजी झाला होता. मात्र, हनिमूनच्या रात्रीच लुटेरी दुल्हन गँगमध्ये सामील असलेली दरोडेखोर नवरी घरातील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबीयांनी टिटवी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 380, 406 आणि 420 अन्वये गुन्हा दाखल केला. या टोळीतील सात जणांना अटक केली आहे. यामध्ये दरोडेखोर नवरी निक्की आणि तिची टोळी आशा, ओमवती, कृष्णा, नन्हे, इर्शाद आणि कविता यांचा समावेश आहे.
लुटेरी दुल्हन गँगचे लोक गरजू लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचे. निक्कीशी त्याचे लग्न लावायचे. ती लग्नाच्या रात्रीच घरातील सर्व साहित्य गोळा करून पळून जायची. टोळीतील इतर सदस्यांनी त्याला लग्नातून पळून जाण्यासाठी मदत केली. ही टोळी विशिष्ट पद्धतीनं काम करायची. आधी गोड बोलून ते लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचे आणि त्यानंतर त्यांना लुटायचे. टोळीतील काही सदस्य निकीची आई, काही वडील, काही भावासोबत नातेवाईक बनले होते. यानंतर प्रथा आणि परंपरेनुसार मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले होते. सासरच्या घरी गेल्यावर लग्नाच्या रात्रीच दरोडेखोर नवरी घराची साफसफाई करून आपल्या टोळीच्या मदतीने पळून जायची. अशाच प्रकारची तक्रार टिटवी पोलिस ठाण्यात 1 मार्च रोजी प्राप्त झाली होती. यानंतर पोलिसांनी तपास करून टोळीच्या सदस्यांना अटक केली आहे.
हनिमूनच्या खोलीत नवरदेव मोठ-मोठ्याने लागला ओरडू अन्…
हनिमूनदरम्यान नवऱ्याच्या चुकीने नवरीचा धक्कादायक मृत्यू…
हनिमूनची तयार करत असतानाच नवरीची रवानगी कारागृहात…
हनिमूनच्या रात्री नवऱ्याला खावू घातली गोळी अन्…
हनिमूनच्या रात्री नवरदेव मोठमोठ्याने ओरडत आला खोलीबाहेर…

