
प्रियकर रात्रीच्या वेळी घरात घुसला अन् काही वेळाने दरवाजा वाजला…
लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रियकर रोज रात्री अंधाराचा फायदा घेत प्रेयसीसोबत राहण्यासाठी जायचा आणि पहाटे लवकर उठून पलायन करायचा. पण, एक दिवस त्याच्या या कृत्याचा भांडाफोड झाला. ग्रामस्थांनी या प्रियकराला रंगेहाथ पकडले आणि बेदम मारहाण केली. शिवाय, पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रेयसीसोबत त्याने विवाह केला पाहिजे, असा निर्णय झाला सर्वानुमते झाला आहे.
सहजनवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे प्रकरण घडले असून, संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत गिडाचे सीओ अनुराग सिंह यांनी सांगितले, की, ‘संबंधित युवक आणि युवती दोघंही प्रौढ आहेत. चौकशीनंतर दोघांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे.’
मिळालेल्या माहितीनुसार, हरपूर-बुदहट पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या प्रियकराचे आजोळ सहजनवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे. तो त्याच्या आजोळी कायम येत असे. तेथील युवतीसोबत प्रेमसंबंध जुळले. पुढे तो प्रेयसीच्या घरी तिला भेटण्यासाठी लपूनछपून जाऊ लागला. कोणी पाहू नये यासाठी तो नेहमी रात्रीच्या वेळी प्रेयसीच्या घरी जात असे. पहाटेच्या सुमारास तो तिच्या घरातून बाहेर पडत असे. असा प्रकार अनेक दिवस सुरू होता. गावातील काही जणांनी हा प्रकार पाहिल्यावर तिच्या कुटुंबीयांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर युवतीच्या कुटुंबीयांनी युवकाला रंगेहाथ पकडण्याची तयारी सुरू केली.
एक दिवस रात्रीच्या वेळी सगळे जण झोपलेले असताना, तो युवक हळूच तिच्या रूममध्ये गेला. ग्रामस्थांनी कुटुंबातल्या इतर सदस्यांना झोपेतून उठवलं आणि रूमच्या बाहेर लाठ्या-काठ्या घेऊन दबा धरून बसले. बराच वेळ रूमचं दार वाजवल्यावर दार उघडले असता आत त्यांना युवक दिसला. त्यांनी युवकाला मारहाण सुरू केली. तोपर्यंत गावातले इतर लोकही घटनास्थळी पोहोचले. मारहाण केल्यावर पोलिसांना फोन करून बोलवण्यात आले. पोलीस युवकाला घेऊन स्टेशनमध्ये आले. गावातले इतर लोक, युवतीचे कुटुंबीयदेखील तिथे पोहोचले. युवकाचे नातेवाईकही पोलीस स्टेशनमध्ये आले. रात्रभर दोन्ही गटांत जोरदार वादविवाद झाला. सकाळी दहा वाजता युवक तिच्याशी कोर्टात विवाह करील यावर एकमत झाले. दोन्ही गटांनी याला मान्यता दिल्यावर पोलिसांनी युवकाला सोडून दिले आहे.
प्रियकराचा मित्र युवतीला शारीरिक संबंधाचे व्हिडीओ असल्याचे म्हणाला अन्…
पत्नीला शेतामध्ये प्रियकरासोबत पाहिल्यानंतर नवरा चिडला अन्…
शारिरीक संबंधावरून मैत्रिणीच्या विवाहीत प्रियकराचे कापले गुप्तांग…
प्रियकराची वाट पाहून आलाच नाही; अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म…
प्रियकराला रंगेहाथ पकडल्यानंतर गावकऱ्यांचा चढला पारा अन्…
प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेला प्रियकराला पकडले अन् विवस्त्र करून…

