
मुंबई पोलिसकाकाचा चाळीसगावात क्रिकेटच्या वादातून खून…
जळगाव: मुंबई पोलिस दलात कर्मचारी असलेले शुभम अर्जुन आगोणे (वय २८ रा. चाळीसगाव) यांचा क्रिकेट स्पर्धेच्या वादातून धारदार तलवारीने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
चाळीसगाव शहरात क्रिकेटचे सामने खेळले जात आहे. या सामन्यात मयत शुभम आगोणे यांचे एका गटासोबत किरकोळ वाद झाला होता. रविवारी (ता. १४) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा वाद उफाळून आला. यात चार जणांनी शुभमवर तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पाटणादेवी रोडवरील बामोशी बाबा दर्ग्याजवळ घडली. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमला काही नागरिकांना तातडीने खासगी वाहनातून शहरातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. शुभम यांच्या मृत्यूची माहिती कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.
दरम्यान, चाळीसगाव शहरात खूनाची घटना घडल्यानंतर चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानतर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चार संशयितांना ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाचा हृदयविकाराने मृत्यू….
हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…
पोलिसकाकाचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू; ‘बोला प्रभू’ आवाज हरपला…
पोलिसकाकाने मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणानंतर केली आत्महत्या…
पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…
पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

