पारवा पोलिसांकडून विद्यार्थ्यांना पोलिस कामकाजाची माहिती…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत 2 जानेवारी रोजी पोलिस स्थापना दिवसचे औचित्य साधून ग्राम माळेगांव व ग्राम इचोरा येथील शाळेमध्ये 3 जानेवारी रोजी पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण लिंगाडे, पोलिस उप निरीक्षक संदीप बारींगे, पोलिस पथक आदींनी भेटी देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पोलिसांनी विद्यार्थ्यांना पोलिस कामकाजाची माहिती दिली. शिवाय, विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षे करिता त्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श, महिला संबंधी होणारे अपराध व त्याचे परिणाम, सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, डायल 112 तसेच स्पर्धा परीक्षा बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. याबाबत माळेगांव व इचोरा येथील उपस्थित शिक्षक यांनी सहकार्य केले. सदर पोलिस स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाकरिता पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण लिंगाडे, पोलिस उपनिरीक्षक संदीप बारिंगे व पारवा पोलिस स्टेशन पोलिस स्टाफ उपस्थित होता.

यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल…

यवतमाळ जिल्ह्यात दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू…

यवतमाळ जिल्ह्यातील विधवा महिलेवर पुण्यात बलात्कार; गुन्हा दाखल…

खुलेआम रेतीची तस्करी करणाऱ्या तीन ट्रकवर पोलिसांची कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!