महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी…

पुणे (सुनिल सांबारे): महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन स्कुटीच्या व्हिलचे रंगाच्या आधारे मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांनी आरोपींकडून २९,०३,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त आहे.

नितीन शहाजी कर्पे (वय ३४ वर्ष, धंदा शेती, व्यापार व क्रेशरप्लॅन्ट रा. मोई, इंडीयन ऑइल पेट्रोल पंपाशेजारी, मोई निघोजे रोड लगत ता. खेड जि. पुणे) यांनी २५/१२/२०२३ रोजी १७.०० वाजता ते २१.४५ वाजताचे दरम्यान मौजे मोई गावचे हद्दीत, इंडीयन ऑइल पेट्रोल पंपाशेजारी, मोई निघोजे रोड लगत ता. खेड जि. पुणे येथे फिर्यादीचे राहते घराचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने पाठीमागील बाजुने जिन्या जवळील खिडकीचे लोखंडी ग्रिलचे बार कशाने तरी कापुन त्यावाटे आत प्रवेश करुन आतील सहा बेडरुम मधील वेगवेगळी लाकडी कपाटे कशाचे तरी सहयाने उचकटुन त्यातील सोन्याचे दागिणे एकुण ४७.८ तोळे वजनाचे त्यात सोन्याचे गंठण, मिनी गंठण, राणीहार, चैन, अंगठया कानातील कर्णफुले जोड, बांगडया, ब्रेसलेट कडे व रोख रक्कम ५,१५,०००/- लाख रुपये असा एकुण (तीस लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे रुपये) अक्षरी ३०,४८,४००/- रुपये किंमतीचा मुददेमाल घरफोडी चोरी करुन चोरुन नेला म्हणुन तक्रार दिली होती. महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन गु.र.नं. ८६५ / २०२३ भा.द.वि.क. ४५७, ३८० अन्वये अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हा हा घर फोडी सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असुन सदरबाबत पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तलाय यांनी वरीष्ठ पोलिस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन यांना सीसीटीव्ही तांत्रिक गोष्टी व गुप्त बातमीदारा मार्फत अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते. दाखल गुन्हयाचे तपासामध्ये वरीष्ठ पोलिस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन यांनी वरीष्ठांच्या सुचना व आदेशाप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केल्यावर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुन्हयाचे तपासाचे अनुशंगाने मौजे मोई, निघोजे, कुरुळी परीसरात पेट्रोलिंग करीत असताना चिंबळी फाटा ते कुरुळी गावाकडे जाणारे रोडवर डोंगरवस्ती येथे एक जण लाल रंग असलेल्या व्हिलच्या स्कुटीवर दिनांक ०२/०१/२०२४ रोजी २१/१५ वाजताचे दरम्यान संशयित रित्या फिरत असताना आढळुन आल्याने त्यास तपास पथकातील अंमलदार यांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता तो स्कुटी घेवुन पळुन जावु लागल्याने त्यास शिताफीने पाठलाग करुन पकडुन त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले त्याचेकडुन सोने, रोख रक्कम व मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

आमिर शब्बीर शेख (वय २५ वर्षे, रा. सध्याचा पत्ता सेक्टर २५, निगडी प्राधिकरण, ता. हवेली जि. पुणे, मुळगाव वडेश्वर काटे, वडगाव मावळ, पुणे) यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ४७.८ तोळे वजनाचे सोने त्यात सोन्याचे २९,०३,४००/- गंठण, मिनी गंठण, राणीहार, चैन, रुपये अंगठया कानातील कर्णफुले जोड, बांगडया ब्रेसलेट कडे व रोख रक्कम ३,००,०००/- लाख रुपये व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल जप्त केली आहे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त संजय शिंदे अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप-आयुक्त संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक वसंतराव बाबर, पोलिस निरीक्षक गुन्हे संतोष कसबे, पोलिस उप निरीक्षक विलास गोसावी, पोहवा राजू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर पोना संतोष काळे, किशोर सांगळे, पोकॉ/ शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राहुल मिसाळ, अमोल माटे यांनी केली आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक प्रदिप गायकवाड, महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन हे करीत आहेत.

kashmir
kashmir

पिंपरी-चिंचवडमध्ये युनिट-४ कडून १४ गुन्हे उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

पिंपरी-चिंचवडमध्ये पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीचे कारनामे…

पिंपरी-चिंचवडमध्ये दहशतवाद विरोधी शाखेची मोठी कारवाई…

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन पिस्टलांसह सराईत गुन्हेगारांना अटक…

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तिघींची सुटका…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!