
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या व्हॉट्सऍप सेवेला मोठा प्रतिसाद…
नाशिक (संदीप कद्रे): नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात नागरिकस्नेही पोलिसिंगवर भर देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. शिवाय, सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना शहरातील कारवाई, घडामोडींची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांकडून अभिप्राय, सूचना मागवण्यासाठी शहर पोलिसांनी ९९२३३२३३११ हा व्हॉट्सअप क्रमांक सुरू केला आहे.
नाशिकमधील नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळत असून, दिड दिवसात पोलिस आयुक्त व्हॉट्सॲप क्रमांक 99 233 233 11 यावर २३६ संदेश प्राप्त झाले आहेत. यावरूनच नाशिकमधील नागिरकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
नमस्कार नाशिककरांनो..
कृपया आपल्या मोबाईलवर ९९ २३३ २३३ ११ हा नंबर ‘पोलीस आयुक्त व्हाट्सअप’ म्हणून सेव करून घ्या.#सुरक्षित_नाशिक साठी आपले इनपुट / अभिप्राय / सूचना आम्हाला कळवा… फक्त मेसेजद्वारे – या नंबरवर कॉल करू नका. व्हाट्सअप मेसेज नंबर हा आपत्कालीन प्रतिसाद नंबर नाही.…
— नाशिक शहर पोलीस – Nashik City Police (@nashikpolice) December 26, 2023
संदीप कर्णिक यांनी नाशिक पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून नागरिककेंद्रित पोलिसिंगवर भर दिला आहे. त्यानुसार नाशिक पोलिसांच्या ‘एक्स हँडल’वर नागरिकांनी केलेल्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद दिला जात आहे. नाशिक शहर पोलिसांच्या कारवाईची माहितीही सांगितली जात असल्याने नागरिकांना पोलिसांच्या कार्यप्रणालीची माहिती मिळत आहे. शहर पोलिसांच्या एक्स हँडलवर ४९ हजार फॉलोअर्स आहेत. मात्र, अनेक नागरिक ‘एक्स’ वापरत नसल्याने त्यांच्या सुविधेकरिता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदवून त्यावर कारवाईचे अपडेट मिळविण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
दिड दिवसात तुमच्याकडून पोलीस आयुक्त व्हॉट्सॲप क्रमांक 99 233 233 11 यावर २३६ संदेश प्राप्त झाले.
🟢 शुभेच्छा – ६०.५९% 😀🙏
🟢 वाहतूक – १४.८३%
🟢 पोलीस स्टेशन संबंधित – १२.७१%
🟢 ड्रग्स – २.१२%
🟢 महिला सुरक्षा – १.२७%
🟢 ध्वनी प्रदूषण – ०.८५%
🟢 गस्त घालणे – ०.८५%
🟢 रस्त्यावर… pic.twitter.com/fGU4a2W0J3— नाशिक शहर पोलीस – Nashik City Police (@nashikpolice) December 29, 2023
पोलिसांच्या व्हॉटसॲप क्रमांकावर केवळ सूचना व अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. त्यानुसार सूचना, अभिप्राय व्हॉटसॲप क्रमांकावर नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात वाहतुकीसंदर्भातील समस्या, तक्रारी व सूचना अधिक होत्या. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक स्वतः लक्ष घालून नागरिकांच्या समस्यांचे निरसन करत असल्यामुळे नागरिक आभार व्यक्त करत आहेत.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा ‘सुरक्षित नाशिक’ संकल्पनेवर भर…
Video: नाशिकमध्ये मद्यपान करणाऱ्यांना ‘विशेष चेतावणी’…
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू…
संदीप कर्णिक यांनी स्वीकारला नाशिक पोलिस आयुक्तपदाचा पदभार!
पुणेकरांची मनं जिकली! संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

