
तरंग २०२३: पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा संपन्न!
पुणे (संदीप कद्रे): पुणे पोलिसांनी शिवाजीनगर पोलिस मुख्यालय येथे आयोजित केलेल्या ‘तरंग-२०२३’ मेळाव्यात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांनी अनुभवली. पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे वतीने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या संकल्पनेतुन पोलिस दलातील विविध शाखा घटक यांची परिपुर्ण माहिती सर्वसामान्य नागरीकांना अवगत व्हावी तसेच पोलिस व जनता यांचेमध्ये सौदाहर्याचे वातावरण तयार व्हावे. यादृष्टीकोनातून पुणे शहर पोलिस आयुक्तालय यांनी तरंग – २०२३ या उत्सव मैत्रिचा या बहुविध कार्यक्रम सोहळयाचे २२/१२/२०२३ ते २४/१२/२०२३ रोजी या कालावधीत पोलिस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम सोहळयाचे मुख्य आकर्षण हे वेगवेगळ्या पोलिस घटकांचे प्रदर्शन हे होते. त्यामध्ये पोलिस दलातील विविध शाखा व त्या शाखांमधील चालणारे कामकाज याविषयी ऑडीयो/ व्हिडीओच्या माध्यमांतून माहिती सांगण्यात आली. त्यामध्ये पोलिस दलातील भरोसा सेल, सायबर सेल, दामिनी पथक हे महिलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन यशस्वीरित्या कार्यरत आहेत. त्याप्रमाणे डायल ११२, राज्य राखील बल, दळणवळण संदेश वाहन यंत्रणा, डॉग शो, जलद प्रतिसाद पथक, एन. डी. आर. डेमोचे प्रदर्शन राज्य गुन्हे अन्वेषण कार्यप्रणाली व इतर घटकांची परिपुर्ण माहिती त्यांचे कामकाज याबद्दलची माहिती मेळावा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना देण्यात आली.
मा. मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काल आमच्या प्रदर्शन स्टॉलची पाहणी करत असताना हजारो नागरिकांसोबत वेळ घालवला आणि सहभागींशी सविस्तर संवाद साधला.
Day 3 of #Tarang2023 has just begun today and we look forward to see you soon.#PunePoliceCitizenConnect pic.twitter.com/l0IoNqRnE9
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) December 24, 2023
सांस्कृतिक कलेचा वारसा असणारे पुणे शहरातील स्थानिक कलाकार यांची कलाकृती (Artison Gallery) या शिर्षकाखाली सर्व सामान्यांसाठी प्रदर्शित करण्यात आले. त्यामध्ये पुण्यातील स्थानिक कलाकार, मातीची भांडी, पर्यावरणपुरक प्लास्टिक पदार्थाचे पुर्नप्रकल्पाने उपयोगी वस्तु, तांबे पितळ या भांडयाचे प्रदर्शन, तसेच फुलेझाडे, रोपवाटीका पुस्तक स्टॉल इत्यादी यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
नविन पिढी, लहान बालके यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणुन विज्ञात प्रदर्शन,मुलांसाठी खेळप्रकार, व्हिडीओचे माध्यमांतुन लहान बालकांसाठी गुड टच, बॅड टच यासारखे प्रबोधनपर प्रदर्शन ‘किड्स झोन’ चे माध्यमांतुन प्रदर्शित करण्यात आले होते. समाजातील सर्व घटकांचे या कालावधीत मनोरंजन व्हावे तसेच पोलिसांचे कामकाजाची माहिती व्हावी आणि पोलिस व जनता यांचेत सुसंवाद व्हावा या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात आले तसेच वाद्यवृंद (ऑकेस्ट्रा) आणि मराठी सिनसृष्टीतील नामवंत कलाकार इतर सिलीब्रीट्री यांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तरंग २०२३, 𝐃𝐚𝐲 𝟐.. 💙🙏#PoliceCitizenConnect #PunePolice pic.twitter.com/V9eGWpcAwX
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) December 23, 2023
या सर्व मनोरंजना बरोबरच खाद्य संस्कृतीचेही स्टॉल प्रदर्शनात होते. भारतातील विविध कलाकुसर, खादी, दाग-दागिने, देशी पदार्थ, कपडयाचे प्रदर्शन या विविध वस्तुंचे प्रदर्शन सदर मेळाव्याकरीता पोलिस खात्यामधील वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी, निमसरकारी अधिकारी, स्थानिक कलाकार आणि कल्पक व दर्जेदार कारागीर उपस्थित होते. पोलिस घटकांशी संबधीत क्वीक रिस्पोन्स टिम डेमो, एस. आर. पी. एफ (आखिल पोलिस बॅड स्पर्धेत सहा वेळा सुवर्णपदक मिळालेल्या) पाईप बॅडचे सादरीकरण, डॉग शो, किड्स झोन पोलिस दलातील कलाकार यांनी सादर केलेल्या नृत्य गायन व पाचल वृंद यांनी केलेल्या कला व इतर कला, गार्ड ऑफ ऑनर साठी महिला पोलिस अंमलदार यांनी त्याबाबत केलेले सादरीकरण. किड्स झोन एरीया पोलिस सायन्स डोम अॅक्टीवीटी, नादब्रम्ह ढोलताथा पथक यांचे सादरीकरण प्रियदर्शनी शाळेचे ढोलताशा पथक यांनी केलेले सादरीकरण, हॅन्ड पॅन वादन, असे कार्याक्रम आयोजित करण्यात आले होते.
An eventful 2 days of #Tarang2023 drew in massive crowds of thousands who thronged to the exhibition.
Extend our thanks to Hon. Deputy CM Shri Devendra Fadnavis for gracing the event and spending time at the display arenas.#PunePoliceCitizenConnect pic.twitter.com/zAIT3U7K7K
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) December 23, 2023
मेळाव्यास उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दादा पाटील, माजी पोलिस महासंचालक अजीत पारसनीस, पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस महासंचालक निकेत कौशिक, माजी पोलिस महानिरीक्षक अविनाश पारधी, विशेष पोलिस महानिरीक्षक, (एसआरपीएफ) अशोक मोरोळे, सिनेकलाकार मिनाक्षी शेषाद्री, वैशाली जाधव, ऋतुजा जुन्नरकर, प्रिया बर्डे, मकरंद अनासपुरे, मृणाल कुलकर्णी प्राजक्ता गायकवाड, अमृता खानविलकर, तेजा देवकर, शर्वरी जमिनी, राहुल बेलापुरकर, अमृता घोंगडे, गायक सलिल कुलकर्णी, कार्तिकी गायकवाड, अजीत विस्पुरे, सुजीत सोमन तसेच अथर्व सुदामे, डॅनी पंडीत उद्योगपती पुनीत बालन वगैर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी सदर कार्यक्रमास भेट दिली.
✅ Day 2 of our 𝐂𝐢𝐭𝐢𝐳𝐞𝐧 𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐄𝐯𝐞𝐧𝐭 #Tarang2023 has begun..!
Updates straight from our MOST POPULAR never-seen-before section : 𝐓𝐡𝐞 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐒𝐡𝐨𝐰𝐜𝐚𝐬𝐞 𝐚𝐭 𝐄𝐱𝐡𝐢𝐛𝐢𝐭𝐢𝐨𝐧 𝐇𝐚𝐧𝐠𝐚𝐫 😀
📍Shivajinagar Police Parade Grounds pic.twitter.com/sFrqGlHWEw
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) December 23, 2023
रेडिओ जॉकी आर. जे. संग्राम नयन जयप्रकाश, अक्षय बनकर, भाग्यश्री पालेकर, महिला पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया पंधरकर यांनी कार्यक्रमांचे सुत्रसंचलनाची जबाबदारी पार पाडली. सदर तरंग २०२३ या मेळाव्याला पुणेकर नागरीकांनी तसेच शालेय विद्यार्थांनी यांना उत्स्फुर्तपणे सहभागी होवुन, पोलिस घटकांचे प्रदर्शन, कुशल कारागिर यांनी बनविलेल्या विविध वस्तु, खाद्य पदार्थ यांचा आस्वाद घेतला. तसेच प्रदर्शनात पोलिस घटकांचे विषयी लावण्यात आलेल्या प्रदर्शनाची माहिती घेतली.

Video: पुणे पोलिसांच्या ‘तरंग-२०२३’ मेळाव्यात कार्यक्रमांची मेजवानी..
तरंग-२०२३ पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

