
Video: जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान हुतात्मा…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर गुरुवारी (ता. 21) हल्ला केला. या हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले असून, तीन गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. दहशतवादी हल्ल्यात देशाचे चार जवान शहीद झाले आहेत, तर तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 20 डिसेंबरपासून सुरक्षा दलांनी या भागात दहशतवाद्यांविरोधात घेराव आणि शोध मोहीम सुरू केली होती. लष्कराच्या दोन गाड्यांमधून सैनिक प्रवास करत होते. त्यावेळी पाळत ठेवून हा हल्ला केला.
#WATCH | Security forces are conducting a search operation in the forest area of Dera ki Gali in the Rajouri sector after the terrorist attack on Army vehicles yesterday pic.twitter.com/V56EjGzfC2
— ANI (@ANI) December 22, 2023
दरम्यान, महिनाभरात याच भागात दहशतवाद्यांनी लष्करावर केलेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी 22 नोव्हेंबरला राजौरी येथे झालेल्या चकमकीत 5 जवान हुतात्मा झाले होते. गेल्या महिन्यात दोन कॅप्टनसह पाच लष्करी जवान हुतात्मा झाले होते. नोव्हेंबरमध्ये, दोन दिवसांच्या चकमकीत लष्कराने दहशतवादी कारवायांचा मास्टरमाईंड क्वारी आणि त्याचा एक सहकारी मारला गेला होता. 10 नागरिक आणि पाच लष्करी जवानांच्या हत्येसह अनेक हल्ल्यांचा क्वॅरी मास्टरमाईंड होता.

लेहमध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारचा जवान हुतात्मा…
जवान पांडुरंग तावरे यांना 12 वर्षीय मुलाने दिला मुखाग्नी…
हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…
Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…
जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

