पुणे! ससून रुग्णालयातून मंदार किवळे याचा जबाब; सगळं सांगितलं, दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला…

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात बुधवारी (ता. २५) दुपारी मंदार किवळे याच्यावर गोळीबार करून कोयत्याने हल्ला केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींना पोलीस आज (गुरुवार) न्यायालयात हजर केले जाणार आहे. दुसरीकडे ससून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या मंदार किवळे याचा जबाब पोलिसांनी घेतला आहे.

पोलिसांना दिलेल्या जबाबात मंदारने सांगितले की, आमच्या शुभमला तूच मारलंस ना… असे सहा जणांच्या टोळक्याने मला विचारले आणि कोयत्याचे वार करायला सुरुवात केली. हातात असलेल्या पिस्टलने गोळी चालवली, मात्र ती गोळी मला लागली नाही. त्यावेळी गाडीवर बसलेल्या एकाने याच्या डोक्यात कोयते टाका, असे म्हणत माझ्यावर कोयत्याने वार केले आणि त्यानंतर शुभम दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला आहे, असे ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

“माझ्यावर आधी गोळीबार केला, नंतर कोयत्याने वार केले आणि हल्लेखोर जोराजोरात ओरडले शुभम दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला आहे, आम्हीच कात्रजचे राजे आहोत, असे हल्लेखोर वार केल्यानंतर म्हणत होते. तसेच हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी शुभम नावाने ओरडत कोयते हवेत फिरवले, असेही मंदार किवळे याने पोलिसांना सांगितले.

दरम्यान, मंदार किवळे याच्यावर गोळीबार करून कोयत्याने हल्ला चढवला. दोन गोळ्या मंदारला चाटून गेल्या. मंदार खाली कोसळताच त्याच्यावर २० ते २५ कोयत्याचे वार करण्यात आले. त्यापैकी डोक्यावर, पाठीवर आणि हातावर अतिशय गंभीर वार आहेत. ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटना घडल्यानंतरच्या केवळ पाच तासांत पुणे पोलिसांनी मंदार किवळे हल्ला प्रकरणात अक्षय चव्हाण, बाब्या पवार, यणप्पा, रोहन कानगुडे, गणेश चव्हाण, रोहन चव्हाण या सहा आरोपींना पकडले आहे. यातील दोघांना दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अष्टविनायक मार्गावर पाठलाग करून पोलिसांनी पकडले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! मंदार किवळे रक्तबंबाळ होऊन चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे शब्द अन् आरोपींची नावे समोर…

पुण्यातील मंदार किवळे प्रकरण! मृतदेहावरच घेतली होती हत्येचा बदला घेण्याची शपथ…

पुणे! शिवाजीनगर कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार! जामिनावर सुटलेल्या मंदार किवळेला का मारलं…

पुणे! शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार, एकाचे हात तोडले, बंदूक टाकून आरोपी फरार…

पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार; सिनेस्टाईलने चौघांना ठोकल्या बेड्या…

पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!