पुणे! मंदार किवळे रक्तबंबाळ होऊन चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे शब्द अन् आरोपींची नावे समोर…

पुणे: पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या सत्र न्यायालयाच्या जवळ टोळक्याने केलेल्या हल्ल्यात मंदार मारुती किवळे (वय 35) हा गंभीर जखमी झाला आहे. न्यायालयासमोरील रस्त्यावर बुधवारी (ता. २५) दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला अन् एकच गोंधळ उडाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी किवळे याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. पिस्तुलातून “मिस फायर” झाल्यामुळे त्याला गोळी लागली नाही. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्या जवळील असलेल्या कोयत्याने मंदार किवळेवर सपासप वार केले. हे वार इतके तीक्ष्ण होते की किवळे याचे दोन्ही हात जवळपास शरीरापासून वेगळे झाले होते. हल्ला केल्यानंतर तात्काळ हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किवळे याला स्थानिकांनी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल केली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींने धक्कादायक माहिती सांगितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

प्रत्यक्षदर्शीने घटनेबाबत सांगताना म्हटले की, एका गाडीवर ट्रिपल, एका गाडीवर डबल असे ते पोरं होते आणि निघून गेले. मागं असे पलटले आणि बघून बोलले असे हात वर करून बोलले, ‘आम्ही कात्रजचे, नादी लागायचं नाही’. यानंतर गंभीर जखमी झालेला व्यक्ती उठला रक्तबंबाळ अवस्थेत हळूहळू हळूहळू येऊन पडला. पडल्यानंतर मग आम्ही जवळ गेलो की भरपूर लोकं होते, कॅमेरे चालू होते; पण आम्ही एक शेवटी माणुसकीच्या नात्याने पोलीस प्रशासन येईल, ॲम्बुलन्स येईल तोपर्यंत त्याला त्याच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट केला पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्यांना नंबर विचारला घरच्यांचा, पण ते त्या अवस्थेत नव्हते, बोलू शकत नव्हते. फक्त बोलले की माझं नाव मंदार किवळे आहे. कात्रज राहणार आहोत. आणि पळ काढणारे पण कात्रजच बोलले होते, 5 जण होते. मी जे पाहिलं गाडीवर जाताना त्यांना 5 जणांना पाहिलं. त्यांच्या हातात कोयते वगैरे होते”, अशी धक्कादायक माहिती प्रत्यक्षदर्शींने दिली आहे.

आरोपीची नावे समोर आली आहेत…
1) अक्षय सुभाष चव्हाण-वय: 20 वर्षे
2) अमोल रामचंद्र चव्हाण-वय: 48 वर्षे
3) स्वप्निल बाजीराव गवळी-वय: 28 वर्षे
4) ओंकार संतोष पवार-वय: 18 वर्षे
5) सूरज साधू मालेकर-वय: 22 वर्षे
6) एक अल्पवयीन मुलगा

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभमचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण याने या संपूर्ण घटनेचा कट रचला होता. त्याने इतर आरोपींना सुपारी देऊन ही घटना घडवून आणली. अक्षय चव्हाण याने 12 ते 15 तरुणांना एकत्र करून कट रचल्याची माहिती समोर आली आहे. अक्षयच्या मनात मंदारविषयी प्रचंड राग होता. त्याला काहीही करून मंदारला संपवायचं होतं. त्यामुळे त्याने सहा पोरं निवडली अन् भावाच्या हत्येची बदला घेण्याचे ठरवले. भावाच्या हत्येचा बदला घेणारच अशी शपथ शुभमनच्या भावाने मृतदेहावर घेतली होती, अशी माहिती आता समोर आली आहे.

मंदार किवळे हा चार ते पाच दिवसांपूर्वी जामीनावर तुरुंगातून बाहेर आला होता. किवळे हा बाहेर आल्या असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्यानुसार त्याच्यावर एक ते दोन दिवसांपासून आरोपींनी “ट्रॅप” लावला होता. किवळे हा न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर भागात जात असताना दबा धरलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केले. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पुण्यातील मंदार किवळे प्रकरण! मृतदेहावरच घेतली होती हत्येचा बदला घेण्याची शपथ…

पुणे! शिवाजीनगर कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार! जामिनावर सुटलेल्या मंदार किवळेला का मारलं…

पुणे! शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार, एकाचे हात तोडले, बंदूक टाकून आरोपी फरार…

पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार; सिनेस्टाईलने चौघांना ठोकल्या बेड्या…

पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…

पुणे! जुन्या वादातून गोळीबाराचा थरार! पिस्तूलासह दोघांना अटक…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!