
पुणे! शिक्षिकेला लेकीच्या वाढदिवसादिवशी संपवलं, आरोपी निघाले…
पुणे : एका शिक्षिकेचा रस्त्यातच अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ट्रकने धडक, मग हत्यारानं सपासप वार आणि शेवटी डोक्यात दगड घालून महिलेला जागीच संपवलं. हत्या करणारा दुसरा, तिसरा कोणी नसून महिलेचाच दीर आहे. प्रॉपर्टीच्या वादातून दिराने भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करून भावाच्या पत्नीचा खून केल्याचे समोर आले आहे.
उज्ज्वला रामदास काकडे (वय ४७, रा. पागांरे, ता. पुरंदर) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या लेकीच्या वाढदिवसाच्या दिवशीच आईची इतकी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या पतीचं आधीच निधन झाले आहे. गुरुवारी (ता. १९) सकाळी साडेआठच्या सुमारास ही हत्या करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास करत सासवड पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. आरोपी चारचाकी वाहनातून पसार झाला होता. त्याने सातारा जिल्ह्यातील शिरवळ परिसरात वाहन सोडून डोंगराळ भागात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सासवड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम राबवून शशिकांत माणिकराव काकडे (रा. बिबवेवाडी) याला ताब्यात घेतले.
View this post on Instagram
उज्ज्वला काकडे या नेहमीप्रमाणे हडपसरमधील शाळेत कामावर जाण्यासाठी बसस्थानकाच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यावेळी आधी त्यांना मालवाहून ट्रकने धडक देण्यात आली. यानंतर त्यांच्यावर भररस्त्यात धारदार शस्त्राने वार केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या उज्वला यांच्या डोक्यात त्याने दगडही घातला. यातच त्यांचा मृत्यू झाला. भररस्त्यात झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शशिकांत माणिकराव काकडे आणि सुलोचना माणिकराव काकडे (दोघं रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, उज्वला काकडे यांचे दीर शशिकांत काकडे यांनी त्यांच्याकडे पती रामदास माणिकराव काकडे यांनी घेतलेल्या पैशांची परतफेड, चेक, सोन्याचे दागिने तसेच इतर कागदपत्रांची मागणी केली होती. याच कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याचा आरोप आहे. या वादातून शशिकांत काकडे याने उज्वला यांची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे सासू सुलोचना काकडे यांनी शशिकांत याला पाठबळ दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात काम करत असलेल्या एअर हॉस्टेसची गोंदियाजवळ हत्या…
पुणे शहरात ऐन दिवाळीत रक्तरंजित थरार! ‘लाल्या’ला जागीच संपवलं…
पुणे! पायल झांबरे मृत्यू प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे…
पुणे! ‘किंग इज बॅक’ असं स्टेट्स ठेवलं अन् सपासप वार…
पुणे जिल्ह्यात पोटच्या मुलीवर बलात्कार अन् गरोदर; बापाला जन्माची अद्दल…

