
पुण्यातील एअर हॉस्टेस संशयास्पद हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! मित्र संशयाच्या भोवऱ्यात…
पुणे: पुणे विमानतळावर एका खासगी विमान कंपनीत एअर हॉस्टेस म्हणून काम करणाऱ्या वर्षा तुरकर (वय ३५) हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. गोंदिया जिल्ह्यातील एका निर्जन जंगलात तिचा मृतदेह आढळला होता. वर्षाच्या नवऱ्याने आणि आईने असा काही खुलासे केल्यामुळे या हत्या प्रकरणात मोठा ट्वि्स्ट आला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील बोंद्रानी वनक्षेत्रात वैनगंगा नदीच्या परिसरात शनिवारी वर्षा तुरकर हिचं शव सापडलं होते. या प्रकरणात कॉन्ट्रॅक्ट किलिंगची शक्यता आहे. वर्षा तुरकर हिच्या पतीने असा दावा केला आहे की, तिने मित्र नितेश अग्रवाल याला 15 लाख रुपये दिले होते. वर्षाने नितेशला बिझनेस विस्तारासाठी 60 लाख रुपये दिले होते. वर्षाने नागपूरचा फ्लॅट विकला होता. त्यांच्यात देवाणघेवाणीवरुन काही वाद झाल्याची शंका वाटते, असे वर्षाच्या आईने म्हटले आहे. त्यामुळे वर्षाचा मित्र संशयाच्या भोवऱ्यात आहे.
View this post on Instagram
आम्हाला नितेशनेच फोन केला, की वर्षाला चाकूला मारलाय, थोड्या वेळाने त्यानेच फोन केला की हॉस्पिटलला नेलंय, त्यामुळे आम्हाला त्याच्यावरच संशय आहे, की त्याचाच सगळा खेळ असून त्यानेच वर्षाला संपवले, असं वर्षाच्या आईने आरोप केला आहे. आई आणि पतीच्या आरोपानंतर पोलिसांनी तातडीने बँक खात्याची तपासणी सुरू केली असून दावे तपासले जात आहेत. तसेच निलेश अग्रवालची देखील कसून चौकशी केली जात आहे.
दरम्यान, दिवाळीनिमित्त पुण्यावून माहेरी आलेल्या वर्षा तुरकर हिला निलेश अग्रवाल जंगलात घेऊन गेला होता. तिथं काही चोरट्यांनी वर्षाच्या पाठीत वार केले अन् त्याच तिचा मृत्यू झाला, असा जबाब निलेशने पोलिसांना दिला होता. त्यानंतर पोलिसांना त्याच्या दाव्यावर संशय आल्यानंतर त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात काम करत असलेल्या एअर हॉस्टेसची गोंदियाजवळ हत्या…
एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या…
सांगली! पुण्यातून दिवाळीनिमित्त गावी गेलेल्या विवाहित प्रेयसीची हत्या…
पोलिस ठाण्याबाहेर प्रेयसीचा गोंधळ अन् पोलिस उपनिरीक्षकाचा आढळला मृतदेह…
कुटुंबात लग्नाची लगबग अन् नगरसेविकेच्या मुलाने घेतला गळफास…
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त अन्…

