नेपाळमधील युवतींसोबत व्यापाऱ्याची ओळख; प्रेम, खासगी व्हिडिओ अन्…

बीड : बीडमधील एका उच्चशिक्षित व्यापाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्याचा खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ॲपवर ओळख करून घेतलेल्या नेपाळमधील दोन तरुणींनी हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत व्यापाऱ्याकडून तब्बल 47 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.

संबधित रक्कम विविध बँक खात्यांसह क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून वसूल करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी महिलांनी भारतात बनावट पासपोर्ट आणि आधार कार्ड तयार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. भारतातील मुलींना परदेशात वेश्या व्यवसायासाठी बेकायदेशीररीत्या पाठवण्याच्या बाबतही आरोप या फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याने केला आहे. याप्रकरणी पुराव्यांसह तक्रार दाखल झाल्यानंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रिया देवी प्रसाद आणि तमन्ना रावत या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या बीड पोलीस आरोपी महिलांचा शोध घेत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, टँगो ॲपवरील ओळख, खासगी व्हिडिओ आणि ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून 47 लाखांची लूट करण्यात आल्याच्या प्रकरणाने बीडमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागे आणखी मोठे रॅकेट आहे का? याचा शोध आता बीड पोलिस घेत आहेत.

पुणे! व्यावसायिकाचा प्रेयसीसोबत परदेशात जायचा बेत अन् घडलं भलतंच…

दिवाळीच्या दिवशीच लॉजवर आढळला व्यापाऱ्याचा मृतदेह…

हॉटेलमध्ये परदेशातील युवतींकडून देह व्यापार; पोलिसांनी टाकला छापा अन्…

Video: व्यापाऱ्याला बेदम मारहाण अन् नग्न करून काढली धिंड…

पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा केला भांडाफोड; हॉटेलमधून अभिनेत्रीची सुटका…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!