
पुणे! आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हृदयविकाराचा झटका…
पुणे: पिंपरी-चिंचवडच्या संत तुकाराम नगर परिसरातील आंत्रिक सोसायटीजवळ एमडी ड्रग्सची विक्री करण्यासाठी येणाऱ्या संशयितांना पकडण्यासाठी त्यांनी सापळा रचला होता, जिथे एका आरोपीला पकडल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन पळणाऱ्या दुसऱ्या आरोपीचा पाठलाग करत असताना अचानक पोलिस हवालदार जावेद बागसिराज (वय ३८) यांच्या त्यांच्या छातीत असह्य कळा आल्याने ते जमिनीवर कोसळले.
वायसीएम रुग्णालयात उपचारादरम्यान उपचारा दरम्यान आलेल्या दुसऱ्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली असून, त्यांच्या निधनाने मूळ कर्नाटकातील आणि अत्यंत सामान्य कुटुंबातून २०१० मध्ये पुणे पोलीस दलात दाखल झालेल्या या कर्तव्यदक्ष, संयमी पोलिसाचा मृत्यू झाला आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलावर तीव्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे 12 वर्षांची मुलगी व 7 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. कसबा येथील कब्रस्तानात सोमवारी दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
View this post on Instagram
संत तुकारामनगर परिसरात 2 संशयित आरोपी एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार जावेद बागसिराज यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने याबाबत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (अँटी नार्कोटिक्स सेल) संत तुकारामनगर भागात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच त्या ठिकाणी अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका संशयिताला पथकाने जागेवरच पकडले. मात्र, त्याचा दुसरा साथीदार पोलिसांना चकवा देऊन पळून जाऊ लागला.
जावेद यांनी धाडसाने पाठलाग सुरू केला. मात्र, धावत असतानाच अचानक त्यांना त्रास सुरू झाला आणि ते जमिनीवर कोसळले. सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना तातडीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा आणखी एक तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी (ता. 26) दुपारी पुण्यातील कसबा पेठ येथील कब्रस्तानात त्यांच्यावर शासकीय इतमामात दफनविधी पार पडला.
दरम्यान, जावेद बागसिराज यांचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील होते; मात्र त्यांच्या वडिलांचे पुण्यात स्थलांतर झाल्यानंतर जावेद यांचा जन्म पुण्यातच झाला. ते 2010 मध्ये पुणे शहर पोलिस दलात भरती झाले होते. सुरुवातीची 8 वर्षे त्यांनी हडपसर आणि मुंढवा पोलिस ठाण्यांमध्ये आपली सेवा बजावली. त्यानंतर 2018 मध्ये स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर ते पिंपरी-चिंचवड पोलिस दलात रुजू झाले. पिंपरी पोलिस ठाण्यात यशस्वी सेवा बजावल्यानंतर त्यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते अमली पदार्थ विरोधी पथकात अत्यंत तत्परतेने कार्यरत होते.
पोलिस स्टेशनला निघालेल्या पोलिस अधिकाऱ्याचा गाडीतच मृत्यू…
पुणे! पोलिस अधिकारी गणेश तनपुरे यांचे हृदयविकाराने निधन; दोन दिवसांवर आली होती बदली…
नाशिक! नवरात्र बंदोबस्तावरील पोलिसांना कारने उडवले; पोलिस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू तर…
महिला पोलिस स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू; बहिणीचा गंभीर आरोप…
पुणे पोलिस दलातील हवालदाराचा बंदोबस्तादरम्यान हृदयविकाराने मृत्यू…
१४ वर्षांपूर्वी पोलिस गोळीबारात मुलगा मृत्यूमुखी पडलेल्या ठिकाणीच पित्याची आत्महत्या…

